बेटी बचाओ- बेटी पढाओ अंतर्गतची जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक संपन्न
Satara News Team
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
- बातमी शेयर करा
सातारा: बेटी बचाओ- बेटी पढाओ अंतर्गतची जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) दीपक ढेपे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.शहरी व ग्रामीण भागातील गरोदर मातांची अंगणवाडीमध्ये शंभर टक्के नोंद करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, खासगी हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलांचीही नोंद झाली पाहिजे. यासाठी खासगी हॉस्पिटलांना पत्र देण्यात यावे. ग्रामीण भागातील व जे कुटुंब अत्यंत गरीब आहेत अशा कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करुन शिक्षणातील त्यांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम व जनजागृती करावी.यावेळी पोषण अभियान जिल्हास्तरीय अभिसरण आराखडा व राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये अंगणवाडी केंद्र इमारतींचे बळकटीकरण, पूरक पोषण आहाराच्या गुणवत्तेची खात्री, प्रभावी आरोग्य सेवा या विषयी चर्चा करण्यात आली
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 2nd Feb 2023 04:52 pm













