आ. शशिकांत शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा आ. महेश शिंदे गटात प्रवेश
Satara News Team
- Fri 12th Jul 2024 11:15 am
- बातमी शेयर करा
वाठार स्टेशन, : बिचुकले, ता. कोरेगाव येथील आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटातील शेकडो मातंग व नाईक समाजातील पुरुष व महिला तसेच युवकांनी विकासकामांना प्राधान्य देत आमदार महेश शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. या कार्यकर्त्यांनी प्रवेश करताच या समाजाच्या सांस्कृतिक भवणासाठी १० ते १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे आमदार महेश शिंदे यांनी जाहीर केले.
आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून बिचुकले गावात शेकडो कोटीची विकास कामे झाली असून काही विकासकामांना मंजुरी मिळाली. अशा नेतृत्वाला यापुढे साथ देण्यासाठी गावातील मातंग व नाईक समाजातील युवकांनी प्रवेश केला असून या दोन्ही समाजाच्या विकासकामासाठी आमदार महेश शिंदे कुठेही कमी पडणार नाहीत, असे कोरेगाव तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रकांत पवार व युवा नेते विशाल कदम यांनी सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विलास पवार, उद्योजक अमर पवार, ग्रामपंचायत सदस्य विश्वास अडागळे, बापू शिरतोडे, किरण पवार, शामराव आव्हाड, नितीन लोखंडे, राजेंद्र पवार, बाळू शिरतोडे, भाऊ शिरतोडे, अंकुश शिरतोडे, आनंदा सोनवणे, चंदू मदने, दिलीप अडागळे, शेखर बोडरे, बाळू बापू आडागळे,उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 12th Jul 2024 11:15 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 12th Jul 2024 11:15 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 12th Jul 2024 11:15 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 12th Jul 2024 11:15 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 12th Jul 2024 11:15 am
संबंधित बातम्या
-
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 12th Jul 2024 11:15 am
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Fri 12th Jul 2024 11:15 am
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Fri 12th Jul 2024 11:15 am
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Fri 12th Jul 2024 11:15 am
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Fri 12th Jul 2024 11:15 am
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Fri 12th Jul 2024 11:15 am
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 12th Jul 2024 11:15 am












