कोरेगावातील १८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता शशिकांत शिंदेंनी भरले 8.5 लाख रुपये
Satara News Team
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
- बातमी शेयर करा
कोरेगाव : नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट तपासणीची मागणी केली आहे. त्यासाठीचे शुल्क ८ लाख ४९ हजार ६०० रुपये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी भरले आहेत. ही मतदान यंत्रे सध्या साताऱ्यात असून बेल (भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड) या कंपनीचे अभियंत्यांकडून ती तपासली जाणार आहेत.ईव्हीएममधील मतांची व्हीव्हीपॅट- प्रमाणे जुळणी न झाल्यास किंवा मतांच्या प्रमाणात शंका निर्माण झाली तर पुनर्गणना केली जाऊ शकते. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये इच्छुक पक्ष किंवा उमेदवारांच्या अर्जावरून ही पुनर्गणना करू शकतात.
त्यानुसार आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वापरलेली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सच्या तपासणीची मागणी अर्जाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स तपासणीसाठी संबंधित उमेदवाराला एका मशीनसाठी ४० हजार रूपये व त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यानुसार आ. शशिकांत शिंदे यांनी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये रक्कम २८ नोव्हेंबरला भरली आहे.
१८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता येणार…
मतदारसंघात ३६५ मतदान केंद्रे होती. त्यावरील ७३० बीयू व तितक्याच सीयू तसेच व्हीव्हीपॅट मशीन त्याला जोडण्यात आला होत्या. एकूण मतदान यंत्रांच्या ५ टक्के मशीन्सची तपासणी करता येते. आ. शशिकांत शिंदे यांनी भरलेल्या रक्कमेनुसार १८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता येणार आहे. त्यामध्ये ईव्हीएमधील मेमरी चीप काढून त्यावरील मतांची तपासणी होणार आहे. त्यासाठी बेल (भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड) कंपनीच्या अभियंत्यांना बोलावले जाणार आहे. त्यापूर्वी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडून मतदान यंत्रे तपासणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात खरी लढत महायुती-शिवसेना (शिंदे गट) उमेदवार आ. महेश शिंदे आणि मविआचे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या निवडणुकीत आ. महेश शिंदे यांना १ लाख ४६ हजार १६६ मते तर आ. शशिकांत शिंदे यांना १ लाख १ हजार १०३ मते मिळाली. या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र या मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेबद्दल आ. शशिकांत शिंदे यांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यांनी पुन्हा मतदान यंत्रे तपासणी मागणी केल्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
-
फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
-
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sun 1st Dec 2024 08:22 pm
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Sun 1st Dec 2024 08:22 pm











