म्हावशी ते धक्का या रस्त्यासाठी २१२.४९ कोठी मंजुर
बबनराव कांबळे यांच्या आंदोलनाची राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दखलSatara News Team
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
- बातमी शेयर करा
पाटण :- कराड - चिपळूण राज्य मार्गावरील म्हावशी ते धक्का (कोयना) रस्त्याची खड्यांनी झालेली चाळण, जागोजागी पडलेले खड्डे याबाबत पं. स. सदस्य बबनराव कांबळे यांनी आक्रमक पवित्रा घेत नुकतेच मंगळवारी दि. ८ ऑगस्ट रोजी संगमनगर (धक्का) येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाची केंद्र स्तरावर तातडीने दखल घेत अखेर केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालय विभागाने या रस्त्यावर २१२.४९ कोठी रुपयेची मंजुरी देत रस्त्याच्या नुतनीकरण कामास मंजुरी दिली. असल्याचे प.स. सदस्य बबनराव कांबळे यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कळविण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
जनतेच्या हितासाठी केलेल्या या आंदोलनाला आठ दिवसांत यश आल्याने त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालय विभागाचे मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना प.स. सदस्य बबनराव कांबळे म्हणाले राष्ट्रीय महामार्गाचे काम पाटण तालुक्यात अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पाटण पासून कोयना भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्याचे काम करणारी एल अँण्ड टी कंपनीने काम सोडून पळून गेली. कोयना पाटण रस्त्याची दशा आणि दुर्दशा झाली आहे. तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा १५ दिवसानंतर अतितीव्र आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका घेत तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करून शासनाला इशारा दिला होता.
या आंदोलनाची या आंदोलनाची केंद्र स्तरावर तातडीने दखल घेत अखेर केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालय विभागाने या रस्त्यावर २१२.४९ कोठी रुपयेची मंजुरी देत रस्त्याच्या नुतनीकरण कामास मंजुरी दिली. असल्याचे प.स. सदस्य बबनराव कांबळे यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कळविण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी बबनराव कांबळे यांनी आंदोलनात सहभाग घेतलेले व यशस्वी करणारे सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रसिद्ध माध्यम, पत्रकार,केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालय विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत फेगडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार,कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता किशोर शेजवळ तसेच महसूल, पोलिस व स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 19th Aug 2023 01:15 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 19th Aug 2023 01:15 pm













