खंबाटकी घाटात सापडलेल्या महीला मृतदेहाचा छडा.... प्रियकरानेच कार मधे डोक्यात हातोडीने घाव घालून काढला काटा.
Satara News Team
- Thu 28th Nov 2024 10:56 am
- बातमी शेयर करा

खंडाळा : खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या अनोळखी महिलेची ओळख पटवून सातारा पोलिसांनी अवघ्या काही तासात हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावला. खून झालेली महिला पुण्यातील वाकड परिसरातून बेपत्ता होती. खंबाटकी घाटात बंद पडलेला मालट्रकच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकला बोलावून चालक दरीकडेला उभा असताना त्याला दरीत एका महिलेचा मृतदेह दिसला. त्याने खंडाळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिरवळ रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह दरीतून वर काढला. मृत महिलेचं वय अदाजे २७ वर्ष होतं.
तसेच डोक्यात लोखडी वस्तुने पाच-सहा घाव घालण्यात आल्याचं आढळून आल्यानं हा घातपाताचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने धागेदोरे मिळवायला सुरूवात केली. पोलिसांनी मिसिंग व्यक्तींची माहिती घेतली असता पुण्यातील वाकड हद्दीतून एक महिला बेपत्ता असल्याचे समजलं. त्या बेपत्ता महिलेले वर्णन मृत महिलेशी जुळले. मृत महिला ही संशयित आरोपी दीनेश पोपट ठोंबरे याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. संशयितानेच पोलीस ठाण्यात तिच्या मिसिंगची तक्रार दिली होती. खंबाटकी घाटात मृतदेह आढळल्यानंतर फलटणचे डीवायएसपी राहुल धस, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासात मृत महिलेची माहिती मिळवली.
खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या महिलेची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. लिव्ह इन रिलेशन संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात असल्यानं संशयितानं डोक्यात हातोड्याचे घाव घालून तिची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. मृतदेह खंबाटकी घाटात आणून टाकल्यानंर दोन दिवसांनी संशयितानेच तिच्या मिसिंगची तक्रार दिली होती. जयश्री विनय मोरे (रा. राजमुद्रा पेट्रोल पंपाशेजारी, मारूंजी, ता. मुळशी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे.
जयश्री मोरे ही चार वर्षांपासून संशयित दीनेश ठोंबरे याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. त्याला सोडून ती आई-वडीलांसोबत राहायला जाणार होती. त्यामुळे तो चिडून होता. २४ नोव्हेंबर रोजी रात्री त्याने तिला बोलावून घेतलं. कारमधून तिला बाहेर घेऊन गेला. कारमध्येच त्याने हातोड्याचे घाव घालून तिची हत्या केली. तसाच तो खंबाटाकी घाटात आला. मृतदेह दरीत टाकून मध्यरात्री पुण्याला गेला.
मृत महिलेच्या ३ वर्षाच्या मुलाला संशयितानं आळंदीत बेवारस स्थितीत सोडून दिलं. सुदैवाने पोलिसांनी त्याच्या आजोबांचा पत्ता शोधून काढला. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं. मुलाला आजोबांच्या ताब्यात दिलं. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयिताला कळली. त्यानंतर मंगळवारी संशयित दीनेश ठोंबरे याने वाकड पोलिसांत जयश्री मोरेच्या मिसिंगची तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी काही तासात या गुन्ह्याचा छडा लावला.
#crime
#khambataki
#pune
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Thu 28th Nov 2024 10:56 am
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Thu 28th Nov 2024 10:56 am
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Thu 28th Nov 2024 10:56 am
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Thu 28th Nov 2024 10:56 am
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Thu 28th Nov 2024 10:56 am
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Thu 28th Nov 2024 10:56 am
संबंधित बातम्या
-
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Thu 28th Nov 2024 10:56 am
-
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Thu 28th Nov 2024 10:56 am
-
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Thu 28th Nov 2024 10:56 am
-
शाहूपुरी पोलीस ठाणे म्हणजे अवैध धंदेवाल्यांचे माहेरघरच!
- Thu 28th Nov 2024 10:56 am
-
'ड्राय डे' दिवशी पोलिसांनी खाकीचीच लक्तरे वेशीवर टांगली
- Thu 28th Nov 2024 10:56 am
-
तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार
- Thu 28th Nov 2024 10:56 am
-
सातार्यात चिमुरडीवर अत्याचार : पोक्सो अंतर्गत शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Thu 28th Nov 2024 10:56 am
-
संजय शेलार खून प्रकरणात एकूण ५ आरोपी ताब्यात
- Thu 28th Nov 2024 10:56 am