नाही तडजोड,, नाही माघार, शिक्षक बँक ताब्यात घेणार, वडूज मेळाव्यात शिक्षक समितीचा निर्धार

No compromise, no withdrawal, teachers will take over the bank, Decision of the Teachers' Committee at the Vadodara Fair
शिक्षक समितीचा विजय असो अशा जयघोष करीत मान्यवरांनी सांगितले की, गेली सात वर्षे भ्रष्टाचार होत आहे,  समितीचे चार संचालक प्रत्येक वेळी विरोध करीत आहे. बँकेची अवस्था बिकट असून २००९ ते २०१५ साली  पाय उतार होताना शिक्षक बँकेचा २कोटी १० लाख रुपये नफा होता. संघाची सत्ता असताना २००९ साली बँक ब वर्गात गेली, त्यानंतर अवघा३५ लाख नफा, तर १ टक्का लाभांश देण्यात आला होता. अ वर्ग चार वर्षात केला. सत्ता बदल झाल्यानंतर गेली सात वर्षात नफा किती पाहिजे ? अवघा १ कोटी ४४ लाख नफा झाला आहे.शिक्षक बँक सत्ताधाऱ्यांनी बँकेचे लचके तोडण्याशिवाय काही ही केले नाही, जेवणावळी सुरू आहे. बँकेची खानावळ केली असून सत्ता येणार नाही म्हणून लूट सुरू आहे. 

सातारा दि : शिक्षक बँकेच्या गुणवत्ता वाढीसाठी स्वच्छ प्रशासन,चांगले नियोजन करून शिक्षक बँकेत सत्ता प्रस्थापित करू शकतो.नाही तडजोड,, नाही माघार, शिक्षक बँक ताब्यात घेणार,अशा पद्धतीने खटाव तालुक्यातील वडूज येथील मेळाव्यात शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आहे. शिक्षक समितीचा विजय असो अशा जयघोष करीत मान्यवरांनी सांगितले की, गेली सात वर्षे भ्रष्टाचार होत आहे,  समितीचे चार संचालक प्रत्येक वेळी विरोध करीत आहे. बँकेची अवस्था बिकट असून २००९ ते २०१५ साली  पाय उतार होताना शिक्षक बँकेचा २कोटी १० लाख रुपये नफा होता. संघाची सत्ता असताना २००९ साली बँक ब वर्गात गेली, त्यानंतर अवघा३५ लाख नफा, तर १ टक्का लाभांश देण्यात आला होता. अ वर्ग चार वर्षात केला. सत्ता बदल झाल्यानंतर गेली सात वर्षात नफा किती पाहिजे ? अवघा १ कोटी ४४ लाख नफा झाला आहे.शिक्षक बँक सत्ताधाऱ्यांनी बँकेचे लचके तोडण्याशिवाय काही ही केले नाही, जेवणावळी सुरू आहे. बँकेची खानावळ केली असून सत्ता येणार नाही म्हणून लूट सुरू आहे. विध्यमान चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी ६२ लाख कर्ज काढले त्याचे१लाख,७,सात ८५० रुपये हप्ता आहे.७२ हजार वेतन असलेला सभासद एवढे हप्ते कसे फेडतो? याबाबत सर्व खात्याकडे तक्रार नोंदवली आहे.कर्जाला मर्यादा १०लाख रुपये असुनही चेअरमन घोरपडे यांनी  गुरुसाठी  दि ३१मे २०२२ रोजी सभा घेऊन वाढीव कर्जाला १५ लाख कर्ज उपलब्ध केले आहे.एका सभासदाला २२लाखाचे कर्ज दिले होते त्याचे ५६ लाख रुपये झाले आहे.त्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात झाली आहे.असे किरण यादव यांनी सांगितले. राज्याध्यक्ष उदय शिंदे म्हणाले,संघटनेची नावे सांगता येत नाही एवढ्या शिक्षकांच्या संघटना आहेत, सेवानिवृत्त शिक्षकांचा आदर्श घेऊन शिक्षक समिती काम करीत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. गणपतराव कलांगे गुरुजी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे भा. वा. शिंपीगुरुजी,भोसले गुरुजी,राजाराम माळी, आबासाहेब पाटील,आरडे, देवाजी नाना होते. अनेक नेते लाभले.अलीकडे शिक्षक समितीची ताकद वाढली आहे.त्याचा वटवृक्ष झाला आहे.लाचारी पत्करली नाही म्हणून शिक्षक समितीला अंगावर घेण्याची कोणाची हिंमत राहिली नाही.निवडणुकीपूर्वी दिवंगत कलांगे गुरुजींच्या स्मारक उदघाटन व बँकेच्या निवडणुकीचा शुभारंभ होईल.असे ही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शंकर देवरे, विश्वभर रणनवरे, किरण गोडसे,अर्जुन यमगर,फडतरे, सौ आशा बारशिंगे,अनिल पिसाळ,सुरेंद्र घाडगे, द गा माने, धीरज गोळे, अरुण पाटील, संचालक नारायण शिंदे,नितीन फरांदे, चंद्रकांत मोरे, विजय गोरे,सौरभ शिंदे मु का खराटे, सतीश नलावडे,सुरेंद्र बारशिंगे, सुरेंद्र घाडगे, अनिल डोईफोडे, सुभाष शेवाळे, आबा देशमुख, अनिल चव्हाण, रत्नमाला मोहिते,महिला आघाडी अध्यक्ष सौ रेखा रामचंद्र कोरडे,सौ शशिकला कुंभार, सौ मीना फडतरे, सौ स्वाती जगताप, सौ मनिषा जाधव, साधना गोंजारी आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले.सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला वर्गानी ही मनोगत व्यक्त करताना नाथ नावाच्या लोकांना चांगले दिवस आल्याचे सांगून समितीचे नेते नवनाथ जाधव यांना संधी मिळावी असा उल्लेख करून शाब्दिक कोटी केली त्याला सर्वांनीच दाद दिली

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला