ओबीसींचा अपमान करणार्या राहुल गांधी यांनी माफी मागावी. भा ज पा चे सातार्यात जोडे मारो आंदोलन
Satara News Team
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
- बातमी शेयर करा
सातारा : मोदी या आडनावावरून टीका करताना ओबीसी समाजाचा अपमान करणार्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने आज राज्यभर आंदोलन केले. सातार्यात जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार पोवई नाका याठिकाणी सातारा शहर, सातारा ग्रामीण, जावळी आणि कोरेगाव मंडलातील कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले.
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे, याबद्दल काहीच बोलत नाहीत आणि संविधानाप्रमाणे न्याय देणार्या न्यायपालिकेच्या आणि नियमाप्रमाणे अध्यादेश काढणार्या लोकसभा सचिवांलयाच्या कामावर आक्षेप घेऊन देशाचे संविधान नाकारत आहेत. याचा आम्ही निषेध करता,े आशा भावना यावेळी भा ज पा पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी कॉंग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी माफी मांगो आशा घोषणा दिल्या
ओ बी सी समाजाचा अपमान होईल असे वक्तव्य राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे, असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे आणि त्याप्रमाणे न्याय पालिकेने राहुल गांधींच्या विरोधात निकाल देऊन त्यांना शिक्षा दिली. आता इतर जण कोणत्याही आडनाव, जाती बद्दल बोलताना शुद्धीवर राहावे आणि भा ज पा च्या नेत्यांबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिला.
यावेळी सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीण प्रभारी गणेश पालखे, कोरेगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव आबा, जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, चिटणीस सुनील जाधव, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, किरण भिलारे, निलेश शहा, डॉ सचिन साळुंखे, आप्पा कदम, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका आशाताई पंडित, मा. नगरसेवक किशोर पंडित, सीमा चौहान, सुनिषा शहा, महिला मोर्च्या शहराध्यक्ष रीना भणगे, वैष्णवी कदम, अश्विनी हुबळीकर, निशा जाधव, वनिता पवार, अनिता बोडस, विक्रम बोराटे, महेंद्र कदम, रवी आपटे, विकास बनकर, संदीप वायदंडे, चेतन घाटगे, देवेंद्र राजपुरे, रोहित नवसरे, संतोष प्रभुणे, अशोक फरांदे, सुधीर काकडे, स्वप्नील बोराटे, हेमंत शिंदे, प्रशांत जोशी, मनीष महाडवाले, चंदन घोडके, युवराज मोरकर, वैभव यादव, अमोल टंगसाळे, अविनाश खर्शीकर, अविनाश पवार, अतुल जाधव, राजाभाऊ भोसले, राजेंद्र भोसले, प्रसाद शिंदे, चैतन्य बोडस यांची उपस्थिती होती.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sat 25th Mar 2023 03:57 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sat 25th Mar 2023 03:57 pm













