आनेवाडी येथील पाटबंधारे वसाहत झाडाझुडपाच्या विळख्यात

नामशेष होण्याची भीती

वाई ;  पुणे बंगलोर महामार्गवर असणाऱ्या आनेवाडी ता जावळी येथील पाटबंधारे वसाहतीमध्ये असणाऱ्या इमारती नामशेष झाल्या असून शासनाने लाखो रुपये खर्च करून उभी असलेली वसाहत आता येथे कोणीही कर्मचारी राहत नसल्याने झाडाझुडूपानी वेढली असून इमारती धोकादायक बनल्या आहेत.
     तब्ब्ल साठ वर्षापूर्वी या वसाहतीची निर्मिती झाली होती, या ठिकाणी 30 ते 35 कुटुंब राहतील अशी व्यवस्था असणाऱ्या या वसाहतीमध्ये एक दोनच कुटुंब राहत आहेत,दोन एकर परिसरात असणाऱ्या या वसाहतीमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त अशी घरे कर्मचारी वर्गासाठी बांधण्यात आली होती मात्र आजपर्यँत कोणत्याही पद्धतीची दुरुस्ती शासनाकडून कारण्यात आली नाही, येथे राहत असलेले कर्मचारी स्वखर्चाने दुरुस्ती करून कसेबसे राहत होते, आता येथील इमारती पूर्णपणे मोडकळीस आलेल्या आहेत, या वसाहतीला आता पूर्णपणे झाडाझुडपाणी वेढले आहे, या इमारतीमध्ये मोठं मोठी झाडे उभी राहिली आहेत, या वसाहतीला गेटच नसल्याने येथे आओ जाओ घर तुम्हारा अशी अवस्था गेल्या अनेक वर्षापासून झाली आहे,त्यामुळे या इमारती म्हणजे तळीरामांचे अड्डे बनले आहेत,
   येथे काही कर्मचारी जीवावर उदार होऊन खिडक्या नसलेल्या गळक्या इमारतीमध्ये राहत होते, मात्र येथे कसलीच दुरुस्ती आजपर्यँत झाली नसल्याने राहत असलेले कर्मचारी नाईलाजाने बाहेर राहु लागले आहेत,त्यामुळे आता येथे आता फक्त मोकळ्या इमारती उभ्या आहेत,या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या दोन शाखा आहेत शाखा तीन मध्ये 16 व व शाखा चार मध्ये सोळा अशी कर्मचारी सख्या आहे. त्याच प्रमाणे येथे कर्मचारी संख्येनुसार जवळपास 30 ते 35 इमारती उभ्या आहेत मात्र आज येथे एकही कर्मचारी मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे राहत नाहीत.
  शासनाने लाखो रुपये खर्चून उभ्या केलेल्या या इमारतीची दुरुस्ती होणार की नाही,पुन्हा येथे कर्मचारी राहवयास येणार की नाही,असे अनेक प्रश्न देखील आहेत. मात्र आता इथे राहणे मात्र खूपच धोकादायक आहे, कारण येथे असलेल्या इमारतीमध्येच मोठं मोठी झाडे उभी राहिली आहेत,याकडे प्रशासन लक्ष देईल का अशी भावना जनतेतून व्यक्त करत आहे

 

 

या धोकादायक बनलेल्या इमारती असल्याने कर्मचारी येथे मुक्कामी नसतात मात्र येथील धोकादायक परिस्थिती पाहता या ठिकाणी दुरुस्ती साठी काय करता येईल यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार आहे,


  सौ वैशाली फरांदे
लोकनियुक्त सरपंच आनेवाडी

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला