पुसेसावळी हत्याकांडातील मृतकाचे पत्नीची आर्थिक मदतीच्या अमिषाने सव्वा लाखांचा गंडा

पुसेसावळी : पुसेसावळी हत्याकांडातील मयत पतीच्या पश्चात पत्नीस विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत मिळवून देतो, असे सांगून पुसेसावळी, ता. खटाव येथील मृताच्या वकील पत्नीकडून सुमारे सव्वालाख रुपये उकळणाऱ्या कोल्हापूर येथील एका भामट्याविरोधात औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
        याप्रकरणी अॅड. आयेशा नुरुल हसन शिकलगार यांनी फिर्याद दिली आहे .वसीम महमुद कुमानदन रा.शाहुपुरी, ता.जि.कोल्हापूर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.दि. ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोंबर दरम्यान ही घटना घडली.
            याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुसेसावळी येथे दि. १० नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजातील दोन युवकांनी हिंदू समाजाचे देवी देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह पोष्ट केल्याच्या गैरसमजातून (पोष्ट झालेबाबत सायबर कडून स्पष्टिकरण आलेले नाही) मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्यामध्ये मशिदीत फिर्यादी आयेशा यांचे पती नुरुलहसन लियाकत शिकलगार यांचा मृत्यू झाला होता. 
         त्यानंतर आयेशा व तीच्या अपत्याच्या भवितव्यासाठी मदत मिळावी म्हणून संशयित वसीम याने केट्टो ऑर्गनायझेशन, कोल्हापूर यांच्याद्वारा सुरु केलेले 'वाईफ कॅम्पेन' व इतर ऑर्गनायझेशनद्वारे तुम्हाला पैशांची मदत मिळवून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून तसेच स्वतःच्या वडिलांचे उपचारासाठी अशा प्रकारे कारणे दाखवत वर नमूद सहा दिवसांच्या कालावधीत आयेशा यांच्याकडून मागणी करत ते फोन पे द्वारे १ लाख १९ हजार रुपये स्वीकारले.
त्यानंतर आयेशा यांनी वारंवार पैशांची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ करून विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अद्याप संशयितास अटक करण्यात आली नसून उपनिरीक्षक ए. ए. ठिकणे तपास करत आहेत.

 

संबंधितांवर अजूनही गुन्हे दाखल होण्याची शक्यता.

संबंधित हत्याकांडातील अनेक पिडीत मुस्लिम समाजातील लोकांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत कोल्हापूर जिल्ह्यातील वसिम महमूद कुमानदन या ठगाने अशाच प्रकारे फसवणूक केल्याची चर्चा असल्याने आणखीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त