सातारा शहरासह परिसरात अवकाळी मुसळधार पाऊस
Satara News Team
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सातारा शहराला तर रात्री साडे आठच्या सुमारास मुसळधार पाऊसाने झोडपले. यामुळे रस्त्यावर सामसूम निर्माण झाली होती. तर या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार असलातरी फळबागांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे.नाेव्हेंबर महिना संपत आलातरी अजुनही थंडीला जोर नाही. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते.
हवामान विभागानेही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविलेला. हा अंदाज जिल्ह्यात खरा होताना दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली. तर सातारा शहर आणि परिसरात रात्री साडे आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास १ तास मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.या पावसामुळे शहरातील रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. तसेच रहदारीही कमी झाली होती. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले.
दरम्यान, जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. तर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फायदा रब्बीतील ज्वारी, मका, गहू, हरभरा पिकाला होणार आहे. पण, फळबागांना फटका बसू शकतो. कारण, अनेक भागात द्राक्ष, डाळिंब फळबागा पक्व अवस्थेत आहेत. अशात गारपिट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
या पावसामुळे गेले दोन तास सातारा शहरातील लाईट बंद असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे
स्थानिक बातम्या
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
संबंधित बातम्या
-
जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
-
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
-
आषाढी वारी पालखी सोहळा आढावा सभा व पालखी मार्ग पाहणी दौरा बैठक.
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
-
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
-
औंध पोलिस ठाण्यातील सर्व कारभारच गोपनीय...?
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
-
बिटलेवाडी-सातारा नवीन एसटी बस सेवेचा शुभारंभ; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत!
- Sat 25th Nov 2023 10:32 pm
-
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Sat 25th Nov 2023 10:32 pm










