आषाढी वारी पालखी सोहळा आढावा सभा व पालखी मार्ग पाहणी दौरा बैठक.
प्रसार माध्यमांना माहिती न देण्याचे कारण गुलदस्त्यात?राजेंद्र बोन्द्रे
- Wed 1st Jul 2026 11:40 am
- बातमी शेयर करा
फलटण. : फलटण पंचायत समिती येथे 30 जून रोजी आढावा सभा आणि पालखी महामार्गाचा पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी उपस्थित राहून समन्वय व नियोजन बैठक च्या माध्यमातून पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने काही निर्णय घेण्यात आले. मात्र या बैठकीपासून स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना हेतूपुरस्पर का जाणीवपूर्वक कोणतीही माहिती न देता दूर ठेवण्यात आल्याचा आरोप होत असून यामुळे तालुक्यातील नागरिक तसेच पालखी सोहळ्याची संबंधित असणाऱ्या सेवाभावी संस्थांना सुद्धा याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषद च्या अध्यक्षा डॉ . प्रिया शिंदे, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, उपसभापती अमोल सस्ते, नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर तसेच काही नगरसेवक ही लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
तसेच पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी अक्षय गव्हाटे, तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी मागील प्रभारी प्रकाश बोंबले, काही पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तसेच पालखी महामार्गावरील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
(पालखी सोहळा हा लाखोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या वारकरी आणि भाविक भक्तांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा तसेच सार्वजनिक स्वरूपाचा महत्त्वाचा सोहळा आहे). परंतु अशा कार्यक्रमाच्या नियोजनासाठी असणाऱ्या आढावा सभा आणि बैठकीमध्ये वाहतूक व्यवस्था स्वच्छतेच्या बाबतीतले प्रश्न आपत्कालीन यंत्रणा भावी भक्तांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यावश्यक असणारा वीज पुरवठा त्यांच्या मुक्कामाच्या व्यवस्था. तसेच अन्नसुरक्षा ते बाबत ची खबरदारी लाखोंच्या उपस्थितीमुळे असणाऱ्या गर्दीवरचे नियंत्रण आणि कोणत्याही दुर्घटना घडू नये याबाबतची मागील अनुभवापासून असणाऱ्या खबरदारीचे उपाय यासाठी विविध विभागातील लोकांचा समन्वय यासारख्या विषयावर अत्यावश्यक असणारे निर्णय घेतले जातात.
दरवर्षी प्रसारमाध्यमांच्याद्वारे या निर्णयांची अचूक माहिती समाजामध्ये नागरिकांच्या पर्यंत आणि सोहळ्यामध्ये सामील झालेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांच्या पर्यंत पोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रसारमाध्यमे सेवाभावी वृत्तीने सातत्याने पार पाडतात. परंतु याबाबत या झालेल्या बैठकीत मागील काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त रेशमा उगले,- तेली यांचाही दौरा झाला त्यावेळी ही कोणतीही माहिती न देता आणि फलटणच्या पालखीतळावरील कोणती पाहणी न करता सर्व दौरा पुढे सोलापूर जिल्ह्यात पाणी साठी निघून गेला, याबाबत ही आश्चर्य व्यक्त केले जात होते, तर या आढावा बैठकीत पाडेगाव ते बरड पाहणी दौरा जिल्हा परिषद च्या सर्वेसर्वा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पुन्हा एकदा फलटणच्या पालखी तळाला भेट न देताच निघून गेल्याचे वृत्त समजून येत आहे, सांगवी येथे सातारा जिल्हा परिषद च्या अंतर्गत बांधलेली पाण्याची टाकी भुईसपाट झाली तिथे मात्र अजूनही त्यांनी भेट देऊन पाहणी केली नाही याबाबत ही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.).30 जून 2026 रोजी झालेली आढावा सभा बैठक झाल्यावरही सातारा जिल्ह्यातील पाडेगाव पासून ते बरड पर्यंत सर्व मार्गांची आणि पालखीतळांची पाहणी झाली परंतु यावेळी ही फलटणच्या पालखीतळाची पाहणी न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पत्रकारांचे म्हणणे आहे की सार्वजनिक हिताच्या विषयावरील या महत्वपूर्ण नियोजित सभा आणि बैठकीला प्रसार माध्यमांना कोणतीही माहिती न देण्याचे नेमके कारण काय? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.
शासनाच्या वतीने विविध स्तरावर विविध विभागांच्याकडून पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या असणारा माहितीचा अधिकार यांची अधिकृत माहिती पोहोचवण्यावर भर दिला जात असताना प्रत्यक्षात अशा एका सार्वजनिक स्वरूपाच्या धार्मिक सोहळ्या बाबत असणाऱ्या बैठकीपासून माध्यमांना दूर ठेवले जाणे ही मोठी गांभीर्याची आणि चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.
फलटणचे स्थानिक प्रसारमाध्यम आणि पत्रकार पालखी सोहळ्याच्या काळात प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या भाविक भक्तांच्या आणि नागरिकांच्या पर्यंत वाहतूक बदलांच्या सूचना पर्यायी मार्ग आरोग्य सुविधा सुरक्षा व्यवस्था पाणीपुरवठ्याबाबतच्या माहिती आणि मुक्कामांच्या व्यवस्था तसेच आपत्कालीन संपर्क यांच्याबाबतची माहिती सर्व भाविक भक्तांच्या पर्यंत आणि नागरिकांपर्यंत सर्वात वेगाने आणि विश्वासार्ह पद्धतीने सेवाभावी वृत्तीने सर्व प्रसार माध्यमे करत असताना सुद्धा त्यांना दूर ठेवणे म्हणजे नागरिकांची गरज होणार असे दिसून येत आहे. आणि याचा परिणाम अप्रत्यक्षपणे नागरिकांच्या आणि वारकऱ्यांच्या गैर सोईवर होणार हे निश्चित दिसून येत आहे अशी प्रतिक्रिया काही पत्रकारांच्या वतीने आता व्यक्त केली जात आहे.
तसेच जर बैठकीमध्ये सर्व काही नियमानुसार आणि पारदर्शकपणे निर्णय होणार होते तर प्रसार माध्यमांच्या उपस्थितीबाबत अधिकाऱ्यांच्याकडे संकोच का ?यासाठी सार्वजनिक स्वरूपाच्या बैठकीतील निर्णय लोकशाही प्रक्रियेचा एक भाग म्हणून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे मत पत्रकारांनी व्यक्त करून याबाबतची दखल वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी केली आहे.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दूर ठेवण्याबाबत काही प्रशासकीय कारण आहे का किंवा याबाबत प्रशासनाने कोणता निर्णय घेतला होता का याबाबतचा खुलासा ही कोणत्याही प्रकारचा अद्याप पर्यंत तरी पत्रकारांना प्राप्त झालेला नाही.
लोकशाहीच्या व्यवस्थेत प्रशासन आणि प्रसार माध्यमे हे नागरिकांच्या प्रति अत्यंत महत्त्वाचे उत्तरदायी घटक मानले जातात त्यामुळे अशा सार्वजनिक स्वरूपाच्या बाबत पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे ही काळाची गरज असून याबाबत सातारा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती या क्षणी नागराजन यांनी किंवा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना जाणून बुजून हेतूपूर्वक दूर ठेवण्याच कारण स्पष्ट होणे गरजेचे असून प्रतिनिधींना निमंत्रण अथवा प्रवेश न मिळाले पत्रकारांमध्ये असणारी संभ्रमावस्था दूर होणार का असा अत्यावश्यक सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक बातम्या
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Wed 1st Jul 2026 11:40 am
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Wed 1st Jul 2026 11:40 am
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Wed 1st Jul 2026 11:40 am
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Wed 1st Jul 2026 11:40 am
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 1st Jul 2026 11:40 am
संबंधित बातम्या
-
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Wed 1st Jul 2026 11:40 am
-
औंध पोलिस ठाण्यातील सर्व कारभारच गोपनीय...?
- Wed 1st Jul 2026 11:40 am
-
बिटलेवाडी-सातारा नवीन एसटी बस सेवेचा शुभारंभ; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत!
- Wed 1st Jul 2026 11:40 am
-
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Wed 1st Jul 2026 11:40 am
-
माजी उपसभापती चंद्रकांत कदम (पाटील) यांचे निधन.
- Wed 1st Jul 2026 11:40 am
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 1st Jul 2026 11:40 am











