कर्तव्याचे दुसरे नाव जयश्री देसाई : अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर

कोल्हापुर :  या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे याचे मुर्तीमंत उदाहरण "जयश्री देसाई" जातीधर्म,लहानमोठा गरिबश्रीमंत असा कोणताही भेदभाव न जुमानता असलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी स्मितभाषी, प्रेमळपणे, कर्तव्य बजावणाऱ्या कोल्हापूरच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांचा वाढदिवस दिनांक 21ऑगस्ट रोजी साजरा होत असून पोलीस मित्र उदय आठल्ये यांनी घेतलेला आढावा.खाकी वर्दी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो "महाराष्ट्र पोलिस",आणि खाकी वर्दी म्हटलं की अनेकांच्या काळजात धडकी भरते, कित्येकांना तर त्यांची सलगीही नको असते,जयश्री देसाई या वरीष्ठ पदावर कार्यरत असताना देखील त्यांच्यात माणुसकी ही गोष्ट नसानसात भरलेली आहे हे नक्की..

 

अल्प परीचय..

* आई सौ.अलका देसाई वडील श्री.ज्ञानदेव देसाई या दाम्पत्याच्या पोटी जयश्री देसाई यांचा जन्म झाला.वडील प्राध्यापक व आई गृहिणी सदन कुटूंबातील घरात जन्माला आलेल्या जयश्री देसाई यांच्या वर लहानपणापासून चांगले संस्कार व्हावेत म्हणून आई वडीलांनी खुप कष्ट घेतले. मुलगी म्हणजे आनंद,मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे दोन्ही घरचा दिवा.मुलगी झाल्याचा आनंद आई वडीलांनी खुप साजरा केला.आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी जयश्री देसाई यांनी देखील पाऊल टाकायला सुरुवात केली. बालवयातच देसाई खूप खोडकर स्वभावाच्या होत्या.बालवयातच घरातून शिक्षणाची प्रेरणा मिळाली त्यामुळे शिक्षणाची आवड लहानपणापासूनच निर्माण झाली होती. शिक्षणामुळे मती येते अन् जीवन गतिमान होते.अशी अनेक उदाहरणे आपल्याला पहावयास मिळतात शिक्षणामुळे कोणी डॉक्टर झाले तर कोणी पोलीस अधिकारी झाले परंतु ते होण्यासाठी मोठा टप्पा गाठायचा आहे याचा देखील त्यांना अंदाज होता... 

शालेय प्रवास..

* प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण करून जयश्री देसाई यांनी एम.ए पुर्ण केले.व शिक्षण क्षेत्रात आपली वाटचाल सुरू ठेवली परंतु पुढे काय करायचे अशी निर्णायक वेळ घेण्याची वेळ आली.तेव्हा त्यांनी शांत संयमी डोक्याने निर्णय घेतअखेर स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला.स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरत असताना अपयश आले म्हणून खचुन जायचे नाही हा निर्धार त्यांनी केला.व तसा त्यांचा प्रवास देखील सुरू झाला.. 

सन 2011 साली जयश्री देसाई एमपीएससीच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिल्या.

* जिद्द चिकाटी ठेवून यश मिळते हा आत्मविश्वास बाळगून देसाई यांनी एमपीएससीची स्पर्धा परीक्षा देऊन पहील्याच प्रयत्नात सन 2011 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला.आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले व प्रशासकीय सेवेत जाऊन सर्वसामान्य नागरिकांची सेवा करायला मिळणार याचा आनंद जास्त होता.. 

खाकीच्या कर्तव्याचा प्रवास सुरू

* स्पर्धा परिक्षेत यश मिळवल्यानंतर जयश्री देसाई या आपल्या प्रशिक्षणासाठी नाशिक येथे रवाना झाल्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांची  २०१२-१३ या कालावधीत रत्नागिरी येथे परिविक्षाधीन पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या काळात जयश्री देसाई यांनी रत्नागिरी मधील महीला वर्गासाठी विशेष प्राविण्य दिले...

* रत्नागिरी येथील कालावधी पूर्ण झाल्यानंतर 2013 ते 2015 या कालावधीत त्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे कार्यरत होत्या.त्यांनी अनेक दरोड्यांच्या गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे केला.सर्व शाळा व महाविद्यालयातील मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण दिले याच काळात जयश्री देसाई या उदयास येऊ लागल्या. 

* सन 2015 ते 2018 या कालावधीत पोलीस उपअधीक्षक जून्नर येथे नियुक्ती झाली याचं काळात बेकायदेशीर धंद्यावर देसाई यांनी आपल्या स्टाईलने कारवाई करत अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आपला विभाग चार्ज ठेवला होता..

* सन 2018 साली त्यांची जातपडताळणी समिती, सातारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली. प्रलंबित सर्व प्रकरणांचा तात्काळ तपास निर्गती केली.सातारचा काळ यशस्वीपणे पार केल्यानंतर पदोन्नतीने महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली. तेथे आयटी विभागाचे कामकाज पाहिले  ई-लर्निंग मोड्युलेस तयार केले तेथे त्यांनी डिव्हायएसपी बॅच क्रमांक 28 चे कोर्स डायरेक्टर म्हणून काम पाहिले करोना काळात एमपीएतील प्रशिक्षणार्थीना ऑनलाइन प्रशिक्षण देखील दिले.

* सन 2020 ते 2022 साली रत्नागिरी येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली 

* रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी समाजमुख कार्य केले आहे. तोक्ते चक्रीवादळ कोरोना महामारी या नैसर्गिक आपत्ती मध्ये फिल्डवर राहून आपले कार्य बजावले तसेच आज अखेर आपल्या कार्य काळात विविध गुन्ह्यांचा तपास करून एक डॅशिंग अधिकारी म्हणून गुन्हेगारी विश्वात आपला दरारा व वेगळी ओळख निर्माण केली.जयश्री देसाई डॅशिंग असुनही तितक्याच हळव्या मनाच्या असणाऱ्या अधिकारी म्हणून परीचीत आहेत एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करत असताना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवत व एक महिला अधिकारी म्हणून न डगमगता बेधडकपणे आपण आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.. 


09 नोव्हेबंर 2022 ते आजअखेर अपर पोलीस अधीक्षक,कोल्हापूर मध्ये कार्यरत असताना वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौतुकास्पद कामगिरी... 


* एक शिस्तप्रिय, निष्ठावान व कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी म्हणून पोलीस दलात जयश्री देसाई यांची ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला आहे.त्यांनी 09 नोव्हें. 2022 रोजी कोल्हापूर जिल्ह्याचा पदभार घेतला.कोल्हापूर वासियांना कार्यशैलीची चुणूक दाखवित कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळविले आहे यात तिळमात्र शंका नाही.. 

* कोल्हापुरात कोम्बिंग ऑपरेशन.व गुन्हेगारांवर पारखी नजर.

* गणेश विसर्जन मिरवणुकीत २४ तास ऑन ड्यूटी.अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई या पूर्णवेळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ठाण मांडून होत्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरील चित्रीकरण पाहून त्या गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना सूचना देत होत्या.

* कोल्हापूरची सीसीटीएनएस प्रणाली, जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

* कोल्हापूर येथे अप्पर पोलिस अधीक्षकांकडून सामान्यांच्या तक्रारींचे निवारण जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात तक्रार निवारण

* कोल्हापूर जिल्हा गृहरक्षक दलाचा कार्यभार सुध्दा उत्तमरित्या सांभाळला आहे... लोकसभा निवडणूक बंदोबस्त २०२४ दिनांक १२ एप्रिल २०२४ ते २१ मे २०२४ या कालावधीत आपण टप्पा क्रमांक 1 ते टप्पा क्रमांक 5 करिता 100% होमगार्ड उपलब्ध करुन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल रीतेश कुमार (भा.पो.से.) पोलीस महासंचालक तथा महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य कौतुक करत सन्मानपत्र दिले ..

* ग्रामपंचायत निवडणूक, महाराष्ट्र- कर्नाटक सिमावादाच्या अनुषंगाने बंदोबस्त तसेच पुणे ग्रामीण येथे कोरेगाव भिमा येथील बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण न होता पार पाडले.कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये योग्य प्रकारे बंदोबस्त केला... 

* श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतीबा देवाची चैत्र व श्रावण षष्ठी यात्रा सुमारे 6 लाख भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. सदर वेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू न देता सुरळीत बंदोबस्त पार पाडला.गणेश उत्सव असेल ,नवरात्र उत्सव असेल कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दिला नाही.वरीष्ठांच्यां मार्गदर्शनाखाली कनिष्ठांना सोबत घेऊन संपूर्ण योग्य ते नियोजन केले नियोजन म्हणजे जयश्री देसाई हे समीकरण झाले आहे हे नक्की..

* आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधनाचा जागर अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाईंचा पुढाकार शाळा- महाविद्यालयांत 101 व्याख्याने


कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या राजकीय नेत्यांचे दौरे व त्यांच्या सुरक्षेचे योग्य नियोजन वरिष्ठांच्या आदेशानुसार पार पाडले... 

भारताचे पंतप्रधान मा‌ श्री.नरेंद्र मोदी व मा.अमित शहा, गृहमंत्री भारत सरकार, मा. आचार्य देवदूत, राज्यपाल, गुजरात, मा. राज्यपाल, केरळ राज्य, मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा राज्य, मा. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री गोया राज्य, मा. शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्या कोल्हापूर जिल्हा दौरा बंदोबस्ताच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे बंदोबस्ताचे योग्य मार्गदर्शन व देखरेख करून बंदोबस्त सुरळीत पार पाडले..

क्राईम कंट्रोल करण्यात मोठे यश... 

•कोल्हापूर विभागामधील मालाविरुद्धचे व शरिराविरुद्धच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी जास्त  प्रयत्न केले. त्यामध्ये मालाविरुद्धचे मोटर सायकल चोरी, दरोडा, जबरी चोरी अशा प्रकारचे विविध गुन्हे उघडकीस आणून फिर्यादीना न्याय मिळवून देण्याचा कसोशिने प्रयत्न करताना दिसत आहेत.. 

* महिला / मुलींची छेडछाड करणाऱ्या इसमांना निर्भया पथकाकरवी कारवाया करून अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करताना जयश्री देसाई या नेहमी दिसतात.. 

घटना घडली की थेट व्हीजीट.

एखादी घटना घडली की जयश्री देसाई या तत्काळ घटनास्थळी जातात व पाहणी करतात. गुन्हेगार व गुन्हेगारीवर वचक धाक निर्माण करण्यात देसाई या यशस्वी झाल्या आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवून त्यांच्यावर प्रतिबंध घालणे याच गोष्टीला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून न्याय मिळेल.व दिलासा मिळेल असे पोलिसिंग असल्याने त्यांच्या विषयी सर्वं सामान्यांच्या मनात वेगळी आपुलकी निर्माण झाली आहे...

पोलीस दलात निष्कलंक कारकीर्द..

पोलिस खात्यात महिलाही चांगले काम करतात हे आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.स्वच्छ प्रतिमा आणि कुठल्याही वादात न राहता आपण आपले कर्तव्य पार पाडु शकतो अशी जयश्री देसाई यांची ओळख आहे. कारण आदर आणि सन्मान हा पोलिसांच्या उराशी राहायला हवा असा नेहमी आपला हट्टाहास असतो. याच कर्तव्यदक्षतेमुळे महाराष्ट्र पोलीस दलात आपण एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे यात तिळमात्र शंका नाही... 

मोठ्या मनाचा, हळवा स्वभाव..

'बोले तैसा चाले' त्याची वदांवी पावले. पोलिस हा पहिल्यांदा माणूस असतो ह्या वाक्यात सर्व काही आले. प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून काम करत असताना लोकांप्रती व कर्मचारी व अधिकारी यांना जिवाला जीव देऊन मिसळून काम करण्याची मोठी हातोटी वाखाण्याजोगी आहे.पोलीस दलात आल्यापासून काम पहिले करणे, प्रसिद्धी मिळो या ना मिळो आपले कर्तव्य पार पाडायचे असा ध्यास आपण नेहमी घेतला..

आपल्या कर्तव्याला मनापासून सलाम..

महाराष्ट्र पोलीस दलात खाकी वर्दीतील महिला अधिकाऱ्यानी देखील चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावले आहे.श्रीमती जयश्री देसाई यांच्या बद्दल बोलेल तितके कमीच आहे. मनमिळावू शांत संयमी स्वभावामुळे कर्तव्याच्या ठिकाणी त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.व आजअखेर कर्तव्य बजावताना निष्कलंक सेवा बजावताना दिसत आहेत हे महिला वर्गासाठी व महाराष्ट्र पोलीस दलासाठी उपयुक्त आहे. अशा कर्तव्यदक्ष खाकीतल्या रणरागिणीला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला