मनोजदादांच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी

देशमुखनगर : रहिमतपूर येथील राधेश्याम मंगल कार्यालय येथे कराड उत्तर मधील कोरेगाव तालुक्यातील महिलांचा मनोजदादांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी महिला सखी मंच या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती झाली होती.


       दीपक साबळे सर प्रस्तुत खेळ पैठणीचा व महाराष्ट्राचीत डान्सर क्वीन धनिष्ठा काटकर, तेजल शिंदे यांच्या अदाकारीने कार्यक्रमामध्ये रंगात आली. सदर कार्यक्रमास कोरेगाव तालुक्यातील जवळपास 30 गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी बोलताना अनेक महिलांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील महिला रानातील कामाच्या  पलीकडे कुठेही जाऊन स्वतःची हाऊस मौज करता येत नाही परंतु स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून मनोजदादानी महिलांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामधून आम्ही मनसोक्तपणे स्वतःची करमणूक करून घेत असतो. तसेच स्वाभिमानी महिला सखी मंच च्या माध्यमातुन महिलाना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आसतात. मनोजदादा युवा मंच व स्वाभिमानी महिला सखी मंच याचे कार्य असेच उत्तरोत्तर वाढत जाऊन मनोजदादांना आमदार करण्यासाठी आम्ही सर्व माता-भगिनी एक दिलाने काम करणार असल्याच्या भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या. 


     राज्य शासनाने चालू केलेल्या लडकी बहिणी योजना आणि स्वाभिमानी महिला सुखी मंच यांच्या माध्यमातून चालत असलेले कार्य यामध्ये शिलाई मशीन, अटाचक्की, वॉटर प्यरिफायर, मोतीबिंदू शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, औषध फवारणी पंप व बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून व केंद्र व राज्य शासनाकडून मिळत मिळत असलेल्या महिलांसाठी योजना यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. 


  सदर कार्यक्रमास मार्गदर्शिका सौ मंगल ताई घोरपडे स्वाभी मानीनी महिला सखी मंच अध्यक्ष समता ताई  घोरपडे कार्याध्यक्ष तेजस्विनी घोरपडे यांच्यासह स्वाभिमानी महिला सखी मंच पदाधिकारी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला