सातारा : सातारा शहरात विकासाच्या वल्गना केल्या जात असल्या तरी त्या फसव्या आहेत. खऱ्या अर्थाने साताऱ्याचा सर्वांगीण विकास अद्याप झालेला नाही. सर्वसामान्य सातारकर सोयी सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचितच आहेत. माझ्याकडे सर्व समावेशक असा साताऱ्याचा विकास आराखडा आहे. तो अंमलात आणण्यासाठी माझ्यासारख्या हक्काच्या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार शरद (अण्णा) काटकर यांनी केले आहे.
सातारा शहरातील विविध प्रभागामध्ये पदयात्रा काढून शरद काटकर यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, विकास ही न थांबणारी प्रक्रिया असते. मात्र जनतेला हव्या असणाऱ्या सुविधांना प्राधान्य देणे, त्या प्रकर्षाने मार्गी लावणे, हे महत्त्वाचे आहे. साताऱ्यात वस्तुस्थिती वेगळी आहे. नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सातारकरांना हवा असणारा सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारा हक्काचा माणूस म्हणून मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. जनतेने मला साथ द्यावी. शहराला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहेत त्या मार्गी लावण्याची धमक माझ्यात आहे. जुना मोटर स्टँडवर दुचाकी, चार चाकी वाहन पार्किंगचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. तो सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पोवई नाका हे शहराचे नाक आहे. या परिसरात वाहन पार्किंगचे समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. ती मार्गी लावण्यासाठी मी जीवाचे रान करणार आहे. हातावर पोट भरणाऱ्या हॉकर्सला हक्काची जागा मिळावी यासाठी माझ्याकडे आराखडा आहे. शहराचा विकास हाच माझा ध्यास आहे. त्यामुळे सातारकर मला निश्चित संधी देतील, आपला हक्काचा माणूस म्हणून माझ्या पाठीशी ठाम राहतील, असा मला विश्वास आहे, असा विश्वासही शरद काटकर यांनी व्यक्त केला.
sharadkatkar
satara
politics
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 28th Nov 2025 10:08 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 28th Nov 2025 10:08 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 28th Nov 2025 10:08 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 28th Nov 2025 10:08 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 28th Nov 2025 10:08 am
संबंधित बातम्या
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Fri 28th Nov 2025 10:08 am
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Fri 28th Nov 2025 10:08 am
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Fri 28th Nov 2025 10:08 am
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 28th Nov 2025 10:08 am
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Fri 28th Nov 2025 10:08 am












