घरात बसणारा नव्हे, तर काम करणारा नगरसेवक निवडून द्या : सौ. स्वप्नाली शिंदे.

महाबळेश्वर : घरात बसून दुसऱ्यांवर टीका करणारा नव्हे तर तुमचे प्रश्न सभागृहात मांडणारा, आवाज उठवून मार्गी लावणारा प्रतिनिधी महाबळेश्वरचे मतदार निवडून देतील. महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. यापुढेही घेणार आहोत. येणार्‍या काळात महाबळेश्वरचा खुंटलेला विकास नक्कीच करून दाखवू, असा विश्वास प्रभाग क्रमांक 8 अ च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ.स्वप्नाली कुमार शिंदे यांनी व्यक्त केला. 

 

      थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या प्रचाराच्या रणधुमाळी मुळे वातावरण चांगलेच तापले आहे. माजी नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली कुमार शिंदे यांनी प्रभाग क्रमांक आठ मधून गिरिस्थान नगर विकास आघाडी (नियोजित) तर्फे नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभागामध्ये त्यांच्या प्रचाराचा जोर वाढला असून प्रचार फेरीत नागरिकांच्या गाठीभेटी घेताना त्या बोलत होत्या. 


यावेळेस पुढे बोलताना त्या म्हणाल्या, २०१६ च्या गतपंचवार्षिक निवडणुकी मध्ये महाबळेश्वरच्या जनतेने मला प्रचंड मताधिक्याने नगराध्यक्षा म्हणून निवडून दिले. मी विविध विकास कामे केली आहेत. त्याचबरोबर विविध प्रभागांमध्ये समस्या देखील मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. परंतु जागतिक महामारी (कोविड) आली आणि जणु जगच थांबले. या अडचणीच्या काळात मी जनतेची साथ सोडली नाही. ज्या जनतेने मला नगराध्यक्षा बनवले त्या जनतेची मी उपासमार कशी होऊ देऊ? मानवता धर्म मी त्या ठिकाणी जाणला. व स्वखर्चाने मी गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी मोफत अन्नधान्य (फुडकिट) वाटप केले. लोकांना दवाखान्यासाठी देखील खूप मदत केली आहे. कोविड काळ आला व त्यानंतर आमच्या मुदती संपल्याने आम्हाला विकासकामे पूर्णत्वाकडे नेता आली नाहीत. 

आमच्या विरोधी सदस्यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभांना येण्याचे टाळले. तब्बल दीड वर्ष हे सदस्य पालिकेत सभांना आलेच नाहीत. ज्या जनतेने त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी, जनतेच्या  अडचणी सोडवण्यासाठी पाठवले हे विरोधी सदस्य त्यांचे कर्तव्यच विसरले. वैचारिक विरोध नक्की असावा, परंतु विरोधाला विरोध नसावा. जनतेला वेठीस धरण्याचे काम गत पंचवार्षिक मध्ये विरोधकांनी केले.


आता जनता अशा सर्व माजी सदस्यांना प्रश्न विचारल्याशिवाय राहणार का? तुम्ही गेल्या पंचवार्षिक मध्ये नगरसेवक म्हणून काय केले? महाबळेश्वर जनता ही सुज्ञ आहे त्यांना सर्व माहित आहे, असेही स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले.


 प्रभाग क्रमांक आठ मध्ये मतदारांशी संवाद साधताना सौ. स्वप्नाली कुमार शिंदे यांना मतदारांचा वारसा प्रतिसाद मिळत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला