माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली

कराड : आगामी कराड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दमदार शक्तिप्रदर्शन करत स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण केले. नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस उमेदवार झाकीर पठाण यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सौ. सत्वशीला चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री रमेश बागवे, सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, अजितराव पाटील, भानुदास माळी, शहर अध्यक्ष अमित जाधव, इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण, अशोकराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कराड शहरात विचारांवर आधारित निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा निर्धार या सभेत प्रकर्षाने जाणवला.


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अनेकांनी आग्रह केला की काँग्रेसने नगराध्यक्षाची उमेदवारी द्यावी. आम्ही कधीच जाती-धर्माच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. काँग्रेस हा सर्वधर्म समभावाचा पक्ष आहे. गांधी, पटेल यांनी देशाला हिंदू राष्ट्र न बनवता सर्वसमावेशक राष्ट्र केले,गांधी कुटुंबाने देश एकसंध राहण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. असा त्याग दुसरा कोणत्याही पक्ष करून शकत नाही. यशवंतराव चव्हाणांचे विचार समजून घ्या; निवडणूक ही विकास व विचारांची राहिली पाहिजे.” त्यांनी पुढे कराडमध्ये केलेल्या कोट्यवधींच्या विकासकामांचा उल्लेख करत सांगितले की पहिल्यांदाच काँग्रेस हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने ते स्वतः प्रचारात उतरले आहेत.


माजी मंत्री नसीम खान म्हणाले, “ही कराड नगरपालिका निवडणूक नसून विचारधारेची निवडणूक आहे. काँग्रेसचे नेते आणि विचारधारा संपवण्यासाठी भाजपकडून कसे प्रयत्न झाले हे आपण पाहिले आहे. पृथ्वीराज चव्हाणांसारखा स्वच्छ, निष्कलंक नेता क्वचितच मिळतो. महाराष्ट्रात मोनो रेल, मेट्रोसारखी मोठी कामे त्यांच्या काळात झाली.”


माजी मंत्री रमेश बागवे यांनी भाजप सरकारवर संविधानाची पायमल्ली केल्याचा आरोप करत सांगितले की, “देशात सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे, मात्र कराडमध्ये हा सलोखा राखण्याचे काम पृथ्वीराज बाबांनी केले.”


अजितराव पाटील यांनी “कराडमधून भाजप हटाव” हा नारा देत काँग्रेसच्या विकासकामांची तुलना भाजपच्या कार्यशैलीशी केली. रणजित देशमुख यांनी काँग्रेसच्या उमेदवारांनी एकजुटीने घेतलेला निर्णय हा स्वाभिमानाचा लढा असल्याचे सांगितले.


नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांनी स्पष्ट केले की, “कराडचा कारभार प्रत्यक्षात पृथ्वीराज बाबा पाहतील. आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्या शब्दापलिकडे जाणार नाही. कराडला स्वच्छ, पारदर्शक नगरपालिका देण्याचा निर्धार आहे.”


या कार्यक्रमाला काँग्रेसचे सर्व 13 उमेदवार, स्थानिक पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अक्षय सुर्वे, समीर पटवेकर, अर्चनाताई पाटील यांचीही भाषणे झाली. अमित माने यांनी निवेदन केले. कराडमधील काँग्रेसचा एकजुटीचा संदेश या सभेतून स्पष्टपणे उमटला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला