महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
Satara News Team
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
- बातमी शेयर करा
- महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारभाऊ शिंदे यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर जोर वाढवला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता कुमारभाऊ शिंदे यांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या महाबळेश्वर मध्ये पाहायला मिळत आहे.
गिरिस्थान नगर विकास आघाडी (नियोजित)चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारभाऊ शिंदे व सौ. स्वप्नाली शिंदे यांच्यासह १७ सहकारी नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसुंडी मारत आघाडी घेतली आहे. महाबळेश्वर शहराचा सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम हाती घेत हे उमेदवार घराघरात पोहोचत आहेत. कुमारभाऊ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटीगाठींवर जोर वाढवला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता कुमारभाऊ शिंदे व त्यांचा पॅनलला नागरिक पसंत करत असल्याचे चित्र सध्या महाबळेश्वर मध्ये पहायला मिळत आहे.
कुमारभाऊ शिंदे यांना नगरसेवक पदाचा तर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्वप्नाली शिंदे यांना नगराध्यक्ष पदाचा अनुभव आहे. या दांपत्याला सामाजिक जाण चांगली आहे. यावेळेस माध्यमांशी बोलताना कुमार शिंदे म्हणाले, कोविड काळात स्वप्नाली शिंदे यांना नगराध्यक्ष पदासाठी केवळ दोनच वर्ष काम करता आले होते. परंतु या अल्पकाळात देखील त्यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला होता. कोविड काळात नगरपालिकेवर प्रशासक आल्यामुळे विकास कामाला जणू काही खिळ बसली होती.
ही उणीव भरून काढून महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी मी व माझी टीम पुन्हा एकदा नव्या जोमाने सज्ज झाली आहे. यावेळेस महाबळेश्वरचा नियोजनबद्ध विकास आराखडा आम्हीं तयार केला असून तो जाहीरनाम्याद्वारे नागरिकांना सादर करण्यात आला आहे. जाहीरनाम्यातील प्रत्येक शब्द न शब्द प्रत्यक्ष कृतीतून खरा करून दाखवणार असल्याचा शब्द कुमारभाऊ शिंदे यांनी मतदारांशी बोलताना दिला.
नगरपालिकेतील प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे तसेच नगराध्यक्ष पदाचा अनुभव देखील असल्यामुळे शासकीय योजना व निधी प्रभागापर्यंत कसा पोहोचवायचा याची मला चांगली जाण व अभ्यास आहे. प्रशासन काळात महाबळेश्वरच्या विकासाला खीळ बसली होती. ती दूर करून सर्वप्रथम स्वच्छतेवर भर देणार आहे. पर्यटकांना केंद्रबिंदू मानुन महाबळेश्वरच्या विविध पॉईंटवर आणखी काही वेगळे करता येईल का ? यासाठी अभ्यासु कमिटी नेमून महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचे काम करणार असल्याचे कुमारभाऊ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
स्थानिक बातम्या
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
संबंधित बातम्या
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
-
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
-
आपला हक्काचा माणूस म्हणून पाठीशी रहा : शरद काटकर
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
-
घरात बसणारा नव्हे, तर काम करणारा नगरसेवक निवडून द्या : सौ. स्वप्नाली शिंदे.
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
-
अधिकृत उमेदवाराशिवाय कोणीही भाजप नेत्यांचे फोटो वापरू नये...आढळल्यास कारवाई...अतुल भोसले.
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
-
धार्मिक जातीय सलोखा व ऐक्य हेच माझे वचन : कुमार शिंदे
- Mon 15th Dec 2025 08:12 pm
-
BREAKING : राजेंच्या शब्दाला मान; ७५ जणांची माघार
- Mon 15th Dec 2025 08:12 pm











