प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
Satara News Team
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
- बातमी शेयर करा
सातारा : आम्ही केवळ निवडणुकीच्या पुरते उगवत नसून गेली १० वर्षे नागरिकांच्या समस्या सोडवत आहे. प्रभाग आणि शहराचा विकास करणे, हाच माझा ध्यास आहे. हा ध्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे जिल्हाचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की पूर्ण करीन असा विश्वास प्रभाग १५ ब च्या शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार मिनाक्षीताई निलेश मोरे यांनी व्यक्त केला.
सातारा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक प्रभाग १५ मधील प्रचारार्थ नागरिकांशी शिवसेनेच्या उमेदवार मिनाक्षीताई मोरे संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, "गेली अनेक वर्ष ज्यांच्याकडे सत्ता दिली त्यांनी रस्ते, पाणी, स्वच्छता , इतर मूलभूत सुविधा सोडवल्याच नाहीत. शिवसेना शहर कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही प्रभागासह सातारा शहरातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. खेळांमध्ये यशस्वी विद्यार्थिनींना खेळाचे साहित्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. प्रभागातील युवा वर्ग महिला वर्ग व वृद्धांसाठी विविध योजना राबवण्याचा आमचा संकल्प आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभागात करण्यावर भर देणार आहे. नुसती निवडणुकीपूर्ती तुमच्याकडे येणार नसून २४ तास तुमच्यासाठी तुमची लाडकी बहिण उपलब्ध असणार आहे. विश्वासाने कार्य करते, मला एकदा संधी द्यावी ,"असे आवाहन केले.
मीनाक्षीताई शिंदे यांच्या व्यक्तीमत्वावर विश्वास ठेवून प्रभाग १५ मधील मतदारांचा वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अनेक जण फक्त आश्वासन देतात त्याची पूर्तता होताना दिसत नाही. यावेळी विद्या बर्गे, पूनम चोरगे, स्वप्नाली चोरगे, सुनीता तडवी, उज्वला देसाई, शिल्पा माने मनीषा चोरगे, राजलक्ष्मी पाटणकर, मोनिका माने, सुरेखा यादव, आरती चोरगे, पूजा होळकर, दीपा साळुंखे, आकाश होळकर, पवित चोरगे, अमित जाधव, राहुल चौधरी, गणेश देसाई, गणेश राजे, संतोष चोरगे, महेश धनगेकर, सुनील मोरे आदी उपस्थित होते.
प्रभाग क्र. ५ मध्ये लक्षात ठेवा 'धनुष्यबाण'
शिवसेनेच्या माध्यमातून शहर आणि प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास निधी, आरोग्य योजनेचा लाभ, रोजगार उपलब्ध करून देण्यात शहर शिवसेना अध्यक्ष निलेश मोरे यांचे योगदान आहे. त्यात प्रभाग क्र. ५ मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुभाष मोरे यांच्यासाठी मतदार एकवटून प्रचारात सहभागी झाले आहेत. निलेश मोरे यांच्या सारखाच प्रभागात नगरसेवक असावा, हीच भावना व्यक्त होऊ लागली आहे. तर धनुष्य बाण या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करा, असे मतदारांना आवाहन निलेश मोरे यांनी बोलताना केले आहे.
स्थानिक बातम्या
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
संबंधित बातम्या
-
फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
-
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Sat 29th Nov 2025 03:08 pm
-
आपला हक्काचा माणूस म्हणून पाठीशी रहा : शरद काटकर
- Sat 29th Nov 2025 03:08 pm










