ही डबक्यात समाधान मानणारी वृत्ती : उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना डिवचले
Satara News Team
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा पालिकेची नवीन इमारत बांधण्यामागे अधिकारी कर्मचारी यांना कार्यक्षमतेने काम करण्यासाठी हे प्रशस्त कार्यालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पण, याची कल्पना आपल्या सारख्या डबक्यातच समाधान मानणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तींना येणार नाही, असा टोसा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना लगावला आहे.सातारा नगरपालिकेतील भ्रष्ट कारभारावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन दिवसांपूर्वी बोट ठेवत उदयनराजे व त्यांच्या सातारा विकास आघाडीवर टीकेची झोड उठवली होती. त्याला उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ''तुमची राजकीय कारकिर्द आमदारकीपासून आणि आमची नगरसेवक पदापासून झाली, ही वस्तुस्थिती बदलणारी नाही.समाजसेवा करत असताना नगरसेवक पदापासून कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना नेहमीच समाजभान असते. अशा व्यक्ती नेहमी जमिनीवर राहतात. आपल्याला एकदम आमदारकी मिळालेली आहे. आपल्यात हाच फरक आहे हे आम्ही बोलून दाखवले. त्याचवेळेस आम्ही केलेले आव्हान स्विकारण्याऐवजी त्यापासून पलायन करुन, पुन्हा बिनपुराव्याचे आरोप करत आपणच आपली पाठ थोपटवून घ्यायचे बिनकामाचे उद्योग बंद करावेत, असा टोला उदयनराजेंनी लगावला आहे.नगरपरिषदेतल्या ज्या अधिका-यांनी पैसे खाल्ले ते एसीबीच्या ट्रॅपमध्ये पकडले गेले. त्यामुळे त्यांचे समर्थन आम्ही यापूर्वी केले नव्हते आणि आजही करीत नाही. सातारा नगरपालिकेची प्रशस्त इमारत असावी, अशी आवश्यकता आपल्या कुपमंडूक प्रवृत्तीला वाटणार नाही हे आम्हाला पटतंय. पण सातारकरांच्या कार्यक्षम सेवांसाठी ते आवश्यक आहे.आज अ वर्ग नगरपरिषद आहे, शहराची लोकसंख्या सुमारे दोन लाखापर्यंत आहे. भविष्याचा विचार करता, तीन लाख लोकसंख्या असली तर महापालिकेचा दर्जा मिळतो. भविष्याचा विचार करुन, आम्ही प्रशासकीय इमारतीची उभारणी करीत आहोत. अधिकारी कर्मचारी यांना कार्यक्षमतेने काम करण्यासाठी, प्रशस्त कार्यालय आवश्यक असते याची कल्पना आपल्या सारख्या डबक्यातच समाधान मानणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तींना येणार नाही. सातारकरांसाठी ही इमारत आवश्यक असल्याने आम्ही ती मार्गी लावत आहोत. त्यासाठी सत्तर कोटी नाही तर आणखी काही रक्कम लागली तरी त्याची तरतुद आम्ही करुन घेऊ, त्याची काळजी तुम्ही करु नका, असेही त्यांनी म्हटले आहे.या इमारतीच्या जागेची सुमारे ४० गुंठे जागा, नगरपरिषदेच्या नावावर होण्यासाठी दानशुर बाबासाहेब कल्याणी यांच्याकडून नाममात्र खरेदीपत्राव्दारे रितसर हस्तांतरीत करुन घेतली आहे. कोट्यावधींची जागा नाममात्र किंमतीत नगरपरिषदेच्या नावे करण्याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. या ठिकाणावर आरक्षण बदलून रितसर जागा खरेदी केली आहे. पूर्वी येथे ऑडिटोरियमचे आरक्षण होते. कै. भाऊसाहेब महाराजांनी कायम ठेवले होते असे तुम्ही सांगत आहात.आता ऑडीटोरियम बांधण्यात मर्यादा आल्या आहेत. होम थिअटरचे माध्यमातुन सर्व कार्यक्रम बघितले जातात. साताऱ्यातील थिएटर्स बंद पडत आहेत. तसेच डि.सी.सी बँकेचा भव्य ऑडिटोरियम आज त्या जागे लगत आहे. त्यामुळे कालबाहय झालेल्या गोष्टींमध्ये दूरदर्शीपणाने बदल करुन त्याची अंमलबजावणी देखील सातारकरांच्या हितासाठी केली तर त्यात रडवेलेपणा करण्याचेकाही कारण नाही. उदयनराजेंनी म्हंटले की, राजपथावरचा उजेड करंज्यात पडल्याचे तुम्हाला दिसले यावरुन तुमची खुजी वृत्तीच दिसत आहे. अशा शब्दांत त्यांनी शिवेंद्रराजेंवर निशाना साधला आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Sun 11th Sep 2022 12:15 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Sun 11th Sep 2022 12:15 pm











