साताऱ्याच्या प्रसाद ने साता समुद्रापार रोवला विजयाचा झेंडा
कु प्रसाद अवघडे याने या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेSatara News Team
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दिनांक 18 ते 20 जुलै 2024 रोजी, भूतान येथे संपन्न झालेल्या साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्ररात अव्वल दर्जाचा समजला जाणारा चॅम्पियन्स कराटे क्लब मधील खेळाडू कु प्रसाद अवघडे याने या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. आणि कराटे क्षेत्रात सातारा शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण अक्षरांनी लिहिले,
प्रसाद हा सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा, कराटे ची आवड आणि गुरूंचे योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. चॅम्पियन्स कराटे क्लब, महाराष्ट्र. या संस्थेचे संकल्पक व संस्थापक श्री संतोष मोहिते सर हे प्रसादाचे गुरू आहेत. यांनी जे कष्ट प्रसाद वर घेतले त्या कष्टाचे प्रसाद ने सोने करून दाखवले. आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतासाठी सुवर्ण पदक खेचून आणले. प्रसाद ने या आधी सुद्धा सब ज्युनियर गटामध्ये सातारा जिल्हा साठी शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये पहिले ऐतेहसिक पदक मिळविण्याचा मान त्याने मिळवला होता. तसेच आता तर आंतरराष्ट्रिय कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड जिंकणार प्रसाद हा सातारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे. यापुढे प्रतीक्षा आहे ती आता जागतिक कराटे चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळण्याची.
प्रसाद ने मिळविलेले या यशाबद्दल साताऱ्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांकडून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्थानिक बातम्या
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sun 21st Jul 2024 07:37 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Sun 21st Jul 2024 07:37 pm













