मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना!

प्रतापगड : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच तसेच त्याचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या अग्र्यातील सुटकेशी केली आहे. "औरंगजेबाने शिवरायांना रोखलं, पण शिवाजीराजे त्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदेनाही रोखण्याचा प्रयत्न झाला पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले", असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला असून या प्रकरणावरुन आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.


किल्ले प्रतापगडावर ३६४ वा शिवप्रतापदिनाचा सोहळा पार पडतोय. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे आदी नेते उपस्थित आहेत. यासमयी केलेल्या भाषणात मंगलप्रभात लोढा यांनी महाविकास आघाडीची तुलना औरंगजेबाशी तर शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या अग्र्यातील सुटकेशी केली.


छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी
बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना, मविआ) बाहेर पडले", असं म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी सेना-मविआची तुलना औरंगजेबाशी तर एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त