घरातच सर्व पदे घेताय, वाई मधील इतर कार्यकर्ते काय मेले आहेत का?..पुरुषोत्तम जाधव यांचा मकरंद पाटील यांच्यावर टीकास्त्र
Satara News Team
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
- बातमी शेयर करा
वाई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच वाई येथे जनसन्मान मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजितदादांनी पुन्हा एकदा मकरंद पाटील यांना आवाहन वाई तालुक्यातील जनतेला केले. त्यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी थेट आमदार मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकाच घरामध्ये सर्व पदे मग वाई मधील इतर कार्यकर्ते मेले आहेत का? असा सवाल करीत शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी पाटील यांच्यावर टीका केली.
जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेत नुकताच नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्तृत्व नसताना फक्त घराणेशाहीच्या नावावर निवडून येणाऱ्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभेच्या आमदाराला आता घरी बसण्याची वेळ आली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांचे नाव घ्यायचे आणि त्यांचेच सत्तेचे विकेंद्रीकरणाचे विचार मोडीत काढून एकाच घरात सगळ्या सत्ता घेऊन जनतेला झुलवत ठेवले आहे. झुंडशाही करणाऱ्या विरोधात आता जनताच पेटून उठली आहे. आता सर्व पक्षातील विरोधकांनी एकच मोट बांधली असून परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
-
फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
-
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Fri 11th Oct 2024 12:42 pm
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Fri 11th Oct 2024 12:42 pm











