महाराष्ट्रात 2024 ला सुवर्णकाळ आणणार -आदित्य ठाकरे

ढेबेवाडी : 2024 हे वर्ष महत्त्वाचे  असून महाराष्ट्र म्हणून आपण कोणत्या बाजूने निकाल देणार  हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे  महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग  पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी हे गद्दार सरकार  मुळासकट गाडले पाहिजे  त्यासाठी महाराष्ट्र मध्ये  2024 ला  परिवर्तन घडवण्यासाठी  सज्ज रहा  असे आव्हान  शिवसेना युवासेना प्रमुख  आदित्य ठाकरे यांनी केले.


      तळमावले तालुका पाटण येथे  शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा  महामेळावा  आयोजित झाला त्यामध्ये बोलत होते यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख  हर्षद कदम पाटण तालुका शिवसेनाप्रमुख सचिन आचरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख  सचिन मोहिते माजी पंचायत समिती सदस्य  सुरेश पाटील, महिला आघाडी प्रमुख  अनिता जाधव  शिवसेना उपजिल्हाप्रमुख  नितीन काशीद  यांची प्रमुख उपस्थिती होती  यावेळी बोलताना  आदित्य ठाकरे म्हणाले खोक्याचे राजकारण करून  सरकार पाडणाऱ्या  40 गद्दारांना  गाढण्यासाठी  जनतेने सज्ज रहावे  या खोक्या सरकारने  महाराष्ट्र मध्ये  एक तरी उद्योग आणला का  महाराष्ट्रात असलेले उद्योग  बाहेर गुजरात ला नेहण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले, केंद्र सरकारने  महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला असून , महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात  योगदान असताना देखील महाराष्ट्र देशातच नाही  अशी वागणूक केंद्राकडून दिली जात आहे,  महाराष्ट्रावर एवढा राग का  असा प्रश्न  जनतेने ह्या खोके सरकारला विचारायला हवा ,  आंदोलने करणाऱ्यावर  लाठी चार्ज करतात, हिम्मत नसलेले सरकार  फक्त आश्वासना पलीकडे  काहीच करू शकत नाहीत, असे सांगून म्हणाले आमचा मतदार संघ तालुका व जिल्हा पुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे  त्यामुळे हे गद्दार आमच्यावर  कोठे आरोप करत आहेत, हे असले  गद्दार आमदार  आपणाला चालणार का  याचा विचार जनतेने करावा असेही  म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्रीकांत माने यांनी केले स्वागत व प्रस्ताविक  जिल्हाप्रमुख हर्षद कदम  व आभार शिवसेना तालुकाप्रमुख  सचिन आचरे यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला