बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतला हृदयविकाराचा गंभीर आजार रुग्णालयात दाखल
Satara News Team
- Thu 16th May 2024 10:34 am
- बातमी शेयर करा
बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच वर्चस्व गाजवत असते. मात्र आता आपल्या स्टाईल आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतला अचानकपणे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या या आजारपणामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
राखी सावंतला हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याचं सांगण्यात येत आहे. तिला हृदयविकाराचा आजार होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राशिखे रुग्णालयातील भयंकर अवस्थेतील फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसत आहे.
राखी सावंतचे हे फोटो पाहून ती शुद्धीत नसल्याचे किंवा गाढ झोपेत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या राखीला हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र यासंदर्भात संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. राखी सावंत याआधीही अनेकदा दाखल झाली आहे.
राखी सावंत जरी रुग्णालयात दाखल झाली असली तरी देखील राखीच्या चाहत्यांचा तिच्यावर विश्वास नसल्याचं बोललं जात आहे. कारण राखीने अनेकदा लोकांना फसवलं आहे. त्यामुळे आता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे यावर नेटकऱ्यांचा विश्वासच बसत नाही आहे. राखीचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
देवा रुग्णालयातील लोकांना हिंमत दे, ती कशीही असली तरी देवा कोणाला रुग्णलयाची पायरी चढायला लावू नकोस. मात्र असं असाल तरी राखीवर विश्वास ठेवणं थोडं कठीण जात आहे, ओव्हर अॅक्टिंगचे साईट इफेक्ट्स, लवकर ठीक हो, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 16th May 2024 10:34 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 16th May 2024 10:34 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 16th May 2024 10:34 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 16th May 2024 10:34 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 16th May 2024 10:34 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 16th May 2024 10:34 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Thu 16th May 2024 10:34 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 16th May 2024 10:34 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 16th May 2024 10:34 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 16th May 2024 10:34 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 16th May 2024 10:34 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 16th May 2024 10:34 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 16th May 2024 10:34 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 16th May 2024 10:34 am











