सकाळी थंडी दुपारी चटका सध्यातरी तापमानात चढ-उतार

सातारा : गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील वातावरणामुळे महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार पहायला मिळाले. परंतु, आता उत्तर महाराष्ट्रावरील हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळला असून, त्यामुळे आकाश निरभ्र राहणार आहे. किमान व कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून, थंडी हळूहळू कमी होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान असून, ढगाळ हवामान, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. अवकाळी पावसाचे ढग आता दूर झाले आहेत. त्यामुळे किमान तापमानामध्ये चढ-उतार होणार आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होत राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आता उत्तर भारतामधील थंडी ओसरली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्याच्या चारही विभागात हवामान कोरडे राहील. अंशत: ढगाळ राहील. किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी व मंगळवारी किमान तापमानत वाढ होईल, असे हवामान खात्याने सांगितले. 

सातारा शहरातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त