कुसवडे धरणासाठी ३१.५८ कोटी रुपये निधी मंजूर
आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; जलसंपदा विभागाकडून मिळाला निधीSatara News Team
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
- बातमी शेयर करा
सातारा- सातारा तालुक्यातील कुसवडे लघु पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत कुसवडे गावाजवळील स्थानिक ओढयावर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. सदर प्रकल्प कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असून सदर प्रकल्पाव्दारे एकुण ३.४९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा (उपयुक्त पाणीसाठा ३.३६३ द.ल.घ.मी.) होऊन सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यामधील २ गावांतील ३५२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून ३१.५८ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
धरणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचावे यासाठी पाणी वितरण व्यवस्था, धरण पोहोचच रस्ता आदी कामे उरली होती. यासाठी निधी मिळावा म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून कुसवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या योजनेस दुसरी सुधारित मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग दरसूची सन २०२२ - २०२३ वर आधारित रु. ३१ कोटी ५८ लाख ३८ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून धरणापासून पाणी वितरण व्यवस्था उघड्या पाईपलाईन ऐवजी बंदिस्त नलिका टाकून करण्यात येणार आहे. तसेच धरणाकडे जाणारा पोहोच रस्ता आदी कामे या निधीतून मार्गी लागणार आहेत. या धरणाच्या लाभक्षेत्रात कुसवडे आणि भाटमरळी या गावातील शेती सिंचनाखाली येणार आहे. निधी उपलब्ध झाल्याने बंदिस्त नलिकेचे काम मार्गी लागणार असून धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
#satara
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 23rd Feb 2024 08:27 pm












