बेपत्ता मनोज गडकरी यांचा मृतदेह नऊ दिवसानंतर सापडला

नागठाणे : नऊ दिवसांपूर्वी नागठाणे ता. सातारा येथील उरमोडी नदीत बेपत्ता झालेल्या सनी उर्फ मनोज सुधाकर गडकरी (वय 29) यांचा मृतदेह सोमवारी दुपारी सापडला.

गेल्या रविवारी सनी उर्फ मनोज गडकरी हा नागठाणे गावातील दोन मित्रांसोबत जुन्या पुलनाजीक उरमोडी नदीत पोहण्यासाठी गेला होता. त्या वेळी परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तो नदीच्या वेगवान प्रवाहात बेपत्ता झाला होता. गेले नऊ दिवस बोरगाव पोलिसांसह त्याचे नातेवाईक नदीपात्रात त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी एनडीआरएफ टीमलाही पाचारण करण्यात आले होते. मात्र वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते.

सोमवारी दुपारी नागठाणे परिसरातील मळवी नावाच्या शिवारालगत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मुलांना नदीपात्रात झुडपात अडकलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळला. या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना देण्यात आली.सायंकाळी उशिरा नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची अवस्था खराब झाल्याने नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकार्‍यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला