राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा शुभारंभ
सेवा पंधरवड्यात जास्तीत जास्त नागरिकांच्या अर्जांचा निपटारा करावा - राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई- Satara News Team
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालवधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याचे काम कसे उठावदार दिसेल यासाठी नागरिकांचे आपले सरकार, नागरी सेवा व इतर वेबपोर्टलवरीत 10 सप्टेंबर पर्यंतच्या अर्जांचा जास्तीत जास्त निपटारा करुन पंधरवडा यशस्वी राबवावा, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा शुभारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आला. यावेळी श्री. देसाई बोलत होते. या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, शासन हे सर्वसामान्याचे आहे. शासन गतीने काम करीत आहे. सहाशेच्या आसपास लोककल्याणकारी शासन निर्णय काढले आहेत. शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्य सचिवांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा रोज किती अर्जांचा निपटारा झाला याचा जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी आढावा घ्यावा व तालुकास्तरावर प्रांताधिकारी यांनी आढावा घ्यावा. या पंधरवड्यात जास्तीत जास्त अर्जांचा निपटारा होण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा व त्यानुसार काम करा. आपण लोकांचे सेवक आहोत या भावनेतून जास्त वेळ काम करावे लागले तर तेही करा.
अर्जांवर जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर निर्णय घ्यायचा आहे त्या अर्जांवर तात्काळ निर्णय घ्या. शासनाकडून काही मदत लागली तर तीही केली जाईल, अशी ग्वाही देवून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा जिल्ह्यात यशस्वी राबवावा, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (महसूल) श्री. आवटे यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी श्री. थोरवे यांनी मानले.
स्थानिक बातम्या
निढळची शाळा देशात रोल मॉडेल ठरेल! खा. शरद पवार
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
कास पठारावरील फुलांचा हंगाम आजपासून सुरू ....उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते उद्घाटन
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
व्यापाऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर राजपथ मार्गावर वाद्ये वाजवण्यावर बंदी, गणेश मंडळे आक्रमक
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
विजयकुमार किसन भुजबळ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
कर्ज प्रकरणी खोटे आश्वासन देऊन शुभम हाउसिंग फायनान्स कंपनीकडून कर्जदारांची मोठ्या प्रमाणात लूट...
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
पोलिसावर पत्नीची तक्रार.अदखलपात्र गुन्हा दाखल
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
संबंधित बातम्या
-
नितीन पाटील यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड...घोषणेची औपचारिकता बाकी
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
-
मी नितीन काकाला खासदार करतो, नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही. हे वक्तव्य तंतोतंत पाळले
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
-
महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज आयोग जाहीर करणार
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
-
दहिवडी नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल पूर्ण .पुढील नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण ?
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
-
कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहाराची याचिका दाखल करते दीपक देशमुख यांच्या घरावर 'ईडी'चा छापा
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
-
वडूजच्या नगराध्यक्षपदाचा आज होणार फैसला;जाधव,गोडसेंची नावेही चर्चेत
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
-
कराड उत्तरचा पुढील आमदार भाजपचाच असेल आ. जयकुमार गोरे
- Sat 17th Sep 2022 01:25 pm
-
मी लढणार अन् जिंकणारहीः प्रभाकर देशमुख
- Sat 17th Sep 2022 01:25 pm