'' खाकी वर्दीतील रणरागिणी उज्वल वैद्य

वाढदिवस विशेष

मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण ,मुलगी शिकली,प्रगती झाली हे ब्रिद् वाक्य आपण लहानपणापासून
ऐकत आलो आहोत
प्रत्येक स्त्री आपले घर
सांभाळणे आणि चालवणे यात सक्षम असतेच, आपण बोलत आहोत पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य यांच्या विषयी.स्वप्न मोठे असेल आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर यश दूर नसते,जिद्दीच्या व शिक्षणाच्या जोरावर आपले भवितव्य नावाप्रमाणे उज्वल करणाऱ्या सातारा अँटी करप्शन ब्युरोच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती उज्वल वैद्य ..

 

 

अल्प परिचय व शिक्षण

श्रीमती उज्वल यांचा जन्म आई सौ.प्रभा वैद्य व वडील श्री.अरूण वैद्य या दाम्पत्याच्या पोटी सोलापूरच्या भुमीत झाला,  त्यांचे प्राथमिक शिक्षण सरस्वती मंदिर प्रशाला येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण हे दयानंद कॉलेज सोलापूर येथे झाले. आई वडीलांच्या सर्व ईच्छा आकांक्षा आपन पुर्ण करायच्या असा ध्यास घेतला. मोठ्या जिद्दीने शालेय, महाविद्यालयीन शिक्षण देखील पुर्ण केले, व पदवीधर शिक्षणासाठी शहरातील नामांकित महाविद्यालयात प्राणीशास्त्रासाठी  प्रवेश घेतला बीएससी (प्राणिशास्त्र)
 एम.ए (मानसशास्त्र)
डिप्लोमा इन फॉरेनसिक सायन्स अँड क्रिमिनॉलॉजि
हॉस्पिटल अँड होटेल हॉटेल मॅनेजमेंट अशा विषयात त्यांचे उच्च शिक्षण झाले आहे.. 

2005 साली पोलिस दलात दाखल..

आपले प्राथमिक माध्यमिक व पदवीधर शिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याची आस लागली होती व तिचे आस त्यांना
स्वस्थ बसू देईना,शिक्षण सुरु असताना श्रीमती उज्वल वैद्य यांना लहाणपणापासुनच खाकी वर्दीचं आकर्षण असल्याने ते स्वप्न साकारण्यासाठी त्यांची कठोर मेहनतीची तयारी अन जिद्द होती.हे स्वप्न कधीच स्वस्थ बसु देत नव्हते. आपनही परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस अधिकारी होऊ शकतो. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 2005साली दिली व पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण देखील झाल्या.पोलीस दलात दाखल होताच आपले खडतर असे प्रशिक्षण योग्य रितीने पुर्ण करून खाकी वर्दीचा प्रारंभ केला.. 

आज अखेर कर्तव्य बजावताना निष्कलंक सेवा.. 

वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिल्यांदा नियुक्ती ठाणे येथे परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक या पदावर करण्यात आली मुंबई मायानगरीत कामांचा चांगला अनुभव गाठीशी घेत त्यांनी ठाणे भिवंडी कल्याण पनवेल गुप्तचर विभाग मुंबई शहर अँटी करप्शन विभाग ये कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेमणुकीस असताना प्रामुख्याने वर्ग 1 व वर्ग 2 च्या लोकसेवकांवर कारवाई देखील त्यांनी कारवाई केली आहे. व सध्या त्या.सातारा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत..  

उल्लेखनीय कामगिरी.

मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावताना उज्वल वैद्य यांनी अनेक महत्त्वाच्या व संवेदनशील जातीय दंगलीमधील परिस्थिती उत्कृष्टरित्या हाताळली आहे त्याबद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी कौतुकाची थाप दिली. ऑनलाइन फ्रॉड मधील 3 नायजेरीन आरोपींना रंगेहाथ पकडले होते याची दखल घेत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले होते.. 

शांत संयमी वागणे

आज अखेर पदाचा अविर्भाव न दाखवत सर्वांना आदराची,आपुलकीची भावना देत असल्याने आपल्याविषयी पोलीस खात्यात आदर,आत्मियता अन प्रेम हे खुप काही आहे.. हि खरी कामाची पोचपावती आहे ..

आई वडिल हेच खरे गुरु.

पोलिस दलातील त खडतर वाटचालीबद्दल व यशाबद्दल आई व वडील हेच खरे गुरु असुन त्यांच्यामुळेच पोलिस खात्यात चांगल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविण्यात आला, आज रोजी आज ते हयात नाहीत परंतु त्यांचे आशिर्वाद सोबत असल्याचे वैद्य नेहमी सांगतात... शिक्षण व जिद्दीने ध्येय गाठले असले तरी त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले आहेत. पोलिस खात्यात जाऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणांना ते खऱ्या अर्थाने आज प्रेरणादायी ठरत आहेत... 

इतर छंद

मुलगी शिकली प्रगती झाली आपण असे अनेक वेळा बोलतो किंवा ऐकतो.स्त्री खरोखर महान आहे तिचे आचार विचार ज्ञान याची आपण कल्पना करू शकत नाही पोलीस दलात देखील कार्यरत असताना उत्कृष्ट स्त्री अभिनय व पुरूष अभिनयाचे राज्यस्तरीय पारितोषिक पटकावले आहे.. या व्यतिरिक्त त्यांना पुस्तकं वाचायला, खुप आवडतात, त्यांना स्वयपाक करायला सुद्धा आवडते. खाकी वर्दी अंगावर असल्याने छंद जोपासायला फारसा वेळ मिळत नाही रोज यशस्वीपणे काम करणा-या या जिद्दी महिला पोलिस अधिका-याला पोलीस मित्र उदय आठल्ये यांचा मनापासून सलाम..

 

अशा या खाकीतल्या रणरागिणीला वाढदिवसाच्या व पुढील भावी वाटचालीसाठी मनापासून लाख लाख शुभेच्छा..

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला