सातारा न्युजचा दणका ! पाचगणीतील बंद इटॅाईलेट सुरु होणार , मुख्याअधिकारी निखील जाधव यांचा लेखी खुलासा

पांचगणी : जगप्रसिद्ध दोन नंबरच पठार अन् उत्तम शैक्षणिक शहर म्हणुन नावलौकीक असलेल्या पाचगणी शहरातील . २ कोटी ५० लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले ईटॅाईलेट गत दोन ते तीन वर्षापासुन बंद आहेत . याबाबत पुणे येथील प्रादेशिक महानगरपालिका प्रशासन संचालनालयकडे तक्रार दाखल करण्यात आली होती . पाचगणी मुख्याअधिकारी निखील जाधव यांना याबाबत ८ दिवसात मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याच्या सुचना सातारा जिल्हा सहाय्यक आयुक्त नगरपालीका प्रशासन अजिक्य पाटील यांनी दिल्या होत्या . तर सातारा न्युज ने याबाबत महत्वपुर्ण भुमीका बजावत सडेतोड भुमीका मांडली होती .

 पाचगणी मुख्याअधिकारी यांनी आपल्या लेखी खुलाशात. नगरपरिषदेकडून प्राधान्याने लवकरच ई-टॉयलेट दुरुस्ती संदर्भात निविदा प्रसिध्द करुन दुरुस्तीचे काम हाती घेणेत येणार आहेत. नगरपरिषदेने ई टॉयलेट दुरुस्तीचा ठेका जा.क्र. वशि-७/१८०/२०२३-२०२४ दिनांक १२/१०/२०२३ रोजीने बंद करण्यात आलेला आहे असा खुलासा सादर केला आहे .


पांचगणी नगरपालीकेचे मुख्याअधिकारी निखील जाधव यांनी सादर केलेल्या खुलाशावरुन . पाचगणी शहरातील ई टॅाईलेट बंद आहेत हे आता लपुन राहीले नाही . पाचगणी शहरातुन याबाबत आता चर्चा रंगु लागल्या असुन इटॅाईलेटचा टेडंर देवुन देखभार दुरुस्तीचा आदेश काढत पुन्हा तो रद्द का ? करण्यात आला याबाबत देखील आता शंकेची पीके वाढली आहेत . पाचगणी सारख्या स्वच्छतेत अव्वल नबंर मिळवणा-या नगरपालीकेकडुन महत्वपुर्ण इटॅाईलेट देखभाल दुरुस्ती वाचुन बंद आहेत ही बाब शहराच्या नावलौकीकाला अशोभनीय आहे . 


सातारा न्युजच्या माध्यमातुन यापुढेही शहरातील समस्याना वाचा फोडुन लोकहीत जपण्याची चळवळ सुरुच राहील याबद्दल शंका नको .

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला