उदयनराजे देणार अजित पवारांनाही तलवार, वाघनखं शुभेच्छा...

सातारा  : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कास तलावाच्या कामाची पहाणी करुन या धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाइनच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.एकनाथ शिंदे, फडणवीस सरकारमध्ये अजित पवार हे सहभागी झाले असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. अजित पवार आणि उदयनराजे यांच्यातील वितुष्ठ सर्वज्ञात आहे. पण, आता उपमुख्यमंत्री अजित पवार हेच भाजप, शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी झाल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी मागील सर्व गोष्टी विसरत त्यांना फोनवरुन संपर्क करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कास तलावाच्या कामाची पहाणी करुन या धरणातून सातारा शहराला  पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाइनच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना तुम्ही अजितदादांना शुभेच्छा दिल्यात का, यावर खासदार उदयनराजे म्हणाले, त्यांचा माझा फोन झाला आहे. सध्या त्यांची धावपळ सुरु असून सर्व विषय मार्गी लावल्यानंतर आपण भेटू व चर्चा करु, असे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार मी त्यांची भेट घेणार असून त्यांना शुभेच्छा देणार आहे.

याबाबत खुद्द उदयनराजेंनी याविषयीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, त्यांचा माझा फोन झाला आहे. सध्या त्यांची धावपळ सुरु असून सर्व विषय मार्गी लावल्यानंतर आपण भेटून चर्चा करु. त्यानुसार मी त्यांची भेट देणार असून त्यांना शुभेच्छा देणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला