पाचगणीच्या प्रभाग ८ब मधून साबेरा नौशाद सय्यद शिवसेनकडून निवडणुकीच्या रिंगणात

पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद २०२५ निवडणुकीत साबेरा नौशाद सय्यद यांना प्रभाग क्रमांक ८-ब मधून एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर उमेदवारी मिळालेली आहे.

    पाचगणी नगर परिषद क्षेत्रातील विकासकामांना गती देणे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि माझ्या प्रभाग क्रमांक ८ तसेच संपूर्ण पाचगणीतील तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीत उभी असल्याचे साबेरा नौशाद सय्यद यांनी सांगितले.

  तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, पाचगणी हे एक शैक्षणिक केंद्र तसेच महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून येथील जनजीवन पर्यटन व शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्थिरता व विकास घडवणे ही माझी प्राथमिक जबाबदारी असेल. त्याचबरोबर पॉवर हाऊस, वाल्मिकी नगर, भीम नगर येथील नागरिकांची टाऊन प्लॅनिंग कागदपत्रे प्रलंबित असून, ती एक वर्षापासून प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी मी ठोस प्रयत्न करणार आहे. पाचगणी नगरपालिकेतील बहुतांश मूलभूत प्रश्न आजही अपूर्ण आहेत. हे प्रश्न निश्चयाने सोडवण्यासाठी कटिबद्ध असून दोन धरणांचे पाणी पाचगणी नागरिकांना पुरवठा व्हावा, या विषयावर सातत्याने आवाज उठविण्यात येईल. असे साबेरा नौशाद सय्यद यांनी सांगितले.

       आपल्या प्रभागाचा व पाचगणी नगरपालिकेचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी निष्ठेने पार पाडणार आहे. आपले मूल्यवान मत धनुष्यबाण या चिन्हावर देवून मला बहुमताने विजयी करा, असे आवाहन साबेरा नौशाद सय्यद यांनी केले आहे. 


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला