कराड नगरपरिषदेसाठी गुरुवारी ६ उमेदवारांचे ८  अर्ज दाखल

कराड : कराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज गुरूवार दिनांक १३ रोजी एकूण ६ उमेदवारांचे ८ अर्ज दाखल झाले. तर काल बुधवारी १ असे आजअखेर एकूण ७ उमेदवारांचे ९ अर्ज दाखल झाले आहेत.

सर्व उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जासोबत जोडावयाच्या आवश्यक कागदपत्रांसह आपले उमेदवारी अर्ज कराड नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सादर केले. तीन दिवसाच्या संथ प्रतिसादानंतर आज चौथ्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. त्यामध्ये प्रभाग ३ अ मधून एकाच उमेदवाराचे ३ अर्ज दाखल झाले. प्रभाग ३ ब मधून १, प्रभाग ७ अ मधून १, प्रभाग ८ ब मधून १ तर प्रभाग १४ अ मधून १ तर १४ ब मधून १ असे एकूण ८ उमेदवारी अर्ज आज दाखल झाले. यामध्ये प्रभाग ३ अ मधून सर्वसाधारण महिला गटातून रजनी अधिकराव पवार यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग ३ ब मधून सर्वसाधारण गटातून साहेबराव रवींद्र शेवाळे यांनी, प्रभाग ७ अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून अंजली नथुराम कुंभार यांनी, प्रभाग ८ ब नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून संजय चंद्रकांत चन्ने यांनी,  प्रभाग 14 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून वर्षा सचिन वास्के,  प्रभाग 14 ब सर्वसाधारण गटातून शिवाजी पांडुरंग पवार आदींनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.


निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास मुदत दिली आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोहिणी शिंदे व प्रशांत व्हटकर कामकाज पाहत आहेत. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला