माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजे गटाची ‘सुकाणू समिती’च फोडल्याचे निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय उलथापालथ

फलटण  : महायुतीच्या माध्यमातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजे गटाची ‘सुकाणू समिती’च फोडल्याचे फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली आसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजे गटातील ज्येष्ठ नेतेच गट सोडून गेल्याने  माजी खा. रणजितसिंह यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ असल्याची चर्चा फलटण येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


गेल्या काही दिवसापूर्वी फलटणमध्ये घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात खासदार गट पुन्हा बॅकफूटवर गेला असल्याची चर्चा संपूर्ण फलटण शहरात रंगली होती. या आत्महत्याच राजकारण करत राजे गटाने पुन्हा खासदार गटावर निशाणा साधला होता.

परंतु  पुन्हा खासदार गटाने उभारी घेतल्यने राजे गटातील ज्येष्ठ नेते भीमदेव बुरूंगले, माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव आणि सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांनी पक्षाला रामराम ठोकला. हे सर्वजण राजे गटाच्या सुकाणू समितीत प्रमुख भूमिका बजावत होते. गटाचे निर्णय घेण्यात आणि रणनीती ठरवण्यात यांचा मोठा वाटा होता.निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या आणि गटाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या नेत्यांनीच पक्ष सोडल्याने राजे गटाला मोठा धक्का बसला आहे. या सलग पक्षप्रवेशांमुळे राजे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, आता राजे गटाच्या पुढील भूमिकेकडे फलटणकरचें लक्ष लागून राहिले आहे.

काही दिवसांपूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील गजानन चौक येथे एक खुली पत्रकार परिषद घेऊन अत्यंत संयमीपणे सर्व कागदपत्र दाखवत रामराजेंच्या कारणाम्यांचा भांडाफोड केल्याचं फलटणकरांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देत आपली उत्तरे दिली होती.

त्या पत्रकार परिषदेनंतर रणजितसिंह यांनी थेट राजे गटाच्या सुकाणू समितीत असलेल्या दिग्गजच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत गेल्याने फलटणच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे  फलटण नगरपरिषद निवडणूक जवळ आलेली असतानाच राजे गटाची प्रमुख फळीच विस्कळीत झाल्याने, आगामी काळात राजे गट या धक्क्यातून कसा सावरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पक्षबदलांचा थेट परिणाम निवडणुकीच्या समीकरणांवर होणार हे निश्चित होणार याची चर्चा फलटण मध्ये सुरु झाली आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला