महाराष्ट्र छात्र सेनेचे दहा दिवसाचे वार्षिक शिबीर महागावं सातारा या ठिकाणी संपन्न

सातारा: महाराष्ट्र छात्र सेनेचे   दहा  दिवसाचे वार्षिक शिबीर   महागावं  सातारा या  ठिकाणी  संपन्न  झाले दोनशे  पन्नास  एनसीसी मुले आणि  दोनशे  पन्नास  एनसीसी मुली  आणि  सेनादालाचा  स्टाफ  यांच्या उपस्थितीत  संपन्न  झाले बक्षीस  वितरण  समारंभास  मनिपाल  विद्यापीठ  जयपूर  च्या फ्याकल्टी ऑफ आर्किटेचर  च्या  डीन डॉक्टर मधुरा  यादव   प्रमुख  अतिथी म्हणून उपस्थित  होत्या
  बाविस महाराष्ट्र बटालियन  एन सी सी चे  प्रमुख  कर्नल  दिपक  ठोंगे, कराड  बटालियन  चे  आडम  ऑफिसर  कर्नल  दिनेश  झा, सुभेदार  मेजर  सतीश  तपसे, चीफ  ऑफिसर  राजेंद्र जगदाळे, अरविंद आगलावे, सविता  माळी,, फर्स्ट ऑफिसर  श्री यादवं,  श्री बागुल,  तसेच  मेघा  तपासे, नीलिखा  पाटील यासह  सेनादालाचे सुभेदार , हवालदार  यांच्या अथक  परिश्रमाणे  दहा  दिवसाचे  शिबीर  यशस्वी  झाले ड्रिल, रायफल, कवयात, योगा, प्राणायाम, स्पर्धा आणि  विविध  तज्ञ् मार्गदर्शकांची  व्यखाने  आयोजित  करण्यात आली  होती
 या स्पर्धेतील बक्षीस  पात्र कॅडेट्स ना प्रमुख  पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस  आणि  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
 या दहा  दिवसाच्या  दरम्यान मातोश्री वृद्धाश्रमात  असणाऱ्या  वृद्ध सदस्यांना दररोज  सायंकाळी  जेवण  देऊन  त्याचे वाटप  करण्यासाठी  विविध कॉलेज मधील   मुलीना  पाठविण्यात  येत होते
उद्देश हाच  होता की एक स्त्री एक घर  उभारू  शकते  त्यामुळे वृद्ध सेवा व्हावी या हेतूने मुलींना पाठविण्यात  येत होते
    डॉक्टर वैष्णवी दिपक  ठोंगे  आणि  डॉक्टर साक्षी जितेंद्र पाटील यांनी या वृद्धाश्रमात  मोफत  तपासणी  आणि  औषधंपचार  केला
      कर्नल  दिपक  ठोंगे  यांनी आपल्या मनोगतात  सांगितले  सर्वांनाच नोकरीं मिळेल असे नाही त्यामुळे व्यवसयात  उतरून  आपली  प्रगती  साधली  पाहिजे त्याच सोबत  उत्तम आरोग्य राखण्यासाठी  दररोज  योगा प्राणायाम  मोर्निंग वॉल्क केले पाहिजे मेडिटेशन  केले पाहिजे आत्म्याचा अभ्यास  हाच  शरीर  विकास त्यामुळे मन  प्रसन्न राहते  असे  ही मत  त्यांनी व्यक्त केले
     प्रमुख  अतिथी डॉक्टर मधुरा  पाटील यांनी  मन, ध्यान, आरोग्य आणि  व्यायाम यांचसोबत  जिद्द चिकाटी  आणि  ध्येयप्रेरित होऊन प्रयत्न केल्यास  हमखास  यश  प्राप्त होते असे उदबोधित  केले
    शेवटी  महाराजा  सयाजीराव  विद्यालयातील मल्लखांब  विभागामार्फत  प्रात्यक्षिक सादर  केले, विविध  गुनादर्शन  कार्यक्रम संपन्न  होऊन शिबिराची  सांगता करण्यात आली
  प्रस्ताविक एनसीसी अधिकारी  सविता  माळी यांनी केले, सूत्रसंचालन  फर्स्ट ऑफिसर अरविंद आगलावे  यांनी केले तर  चीफ  ऑफिसर  राजेंद्र जगदाळे  यांनी आभार  मानले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त