शिवथर- गोवे रस्त्याला कोणी मालक आहे का मालक ?

या रस्त्यावर तब्बल सात ते आठ ठिकाणी पाईपलाईन साठी खोदकाम

शिवथर.(सुनिल साबळे) शिवथर-गोवे रस्त्याचे काम चार ते पाच वर्षांपूर्वी ग्राम सडक योजनेतून अतिशय चांगल्या पद्धतीचे आणि दर्जाचे झालेले आहे परंतु याच रस्त्यावर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल सात ते आठ ठिकाणी रस्त्याची खोदाई करून पाईपलाईन साठी रस्त्याची राख रांगोळी केलेली आहे त्यामुळे वाहन चालक आणि ग्रामस्थ यांच्याकडून या रस्त्याला कोणी मालक आहे का मालक अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले जात आहे. 
            शिवथर-गोवे रस्ता हा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे असून अतिशय चांगल्या पद्धतीचे काम गोवे गावचे शाखा अभियंता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले होते परंतु या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सात ते आठ ठिकाणी पाईपलाईन साठी शेतकऱ्यांनी खोदकाम केले आहे खोदकामासाठी या शेतकऱ्यांनी परवानगी काढलेली आहे का? जर काढली असेल तर कोणत्या नियम व अटी त्यांना लागू केलेल्या आहेत याचीही माहिती घेणे गरजेचे आहे परंतु जर का खोदकाम करण्यासाठी परवानगी काढली नसेल तर संबंधित बांधकाम विभाग यांच्यावर कारवाई करणार का असाही सवाल ग्रामस्थांमधून व वाहनचालकांमधून केला जात आहे. 
            शिवथर-गोवे या रस्त्यावर ज्या कोणी खोदकाम केलेले आहे त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कारवाई करणार का तसेच त्यांची पाठराखण करणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे संबंधित शेतकऱ्यांनी या रस्त्याचे खोदकाम केलेले आहे त्यांच्याकडूनच अतिशय चांगल्या पद्धतीचे काँक्रिटीकरण करून घेणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे तरी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी अशी ही मागणी केली जात आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त