फडणवीस यांनी शिवतीर्थावर घेतली राज ठाकरे यांची भेट

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याने ते भाजपच्या बाजूने झुकल्याची चर्चा होतीच. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात मनसेला देखील वाटा मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद दिले जाईल असे वृत्त समोर येत होते. अशाच आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत न घेता सरकार स्थापन करतानाच भाजपतर्फे मनसेशी जवळीक साधली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या  शिवसेनेला भगदाड पाडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. यातच आत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचे आडाखे बांधले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराची अपक्षे आहे. भाजपशी सलगी केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांना कोणती खाती मिळतात, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता भाजपदेखील सावधगिरीने पावलं टाकत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला