पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात रस्त्यावर ऑइल वाहतूक विस्कळीत
Satara News Team
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
- बातमी शेयर करा
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याने अनेक वाहनांची घसरगुंडी झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, यात गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी, की आज पहाटे घाटातील भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या वळणावर एका गाडीचे ऑइल किमान 100 मीटर अंतरावर पसरले. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तर, काही गाड्या घसरून कठड्यास धडकल्या. यात गाडींचे किरकोळ नुकसान झाले.
मात्र, कसलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सिंगल लेन वाहतूक सुरू केली. या घाटात सकाळपासून सिंगल लेन वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. विकेंड असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी खंडाळा शहरातील टँकर व अग्निशामक यंत्रणा यांना बोलून रस्त्यावर पाणी मारण्यात आले. मात्र, तरीही रस्ता निसरडाच राहिला आहे. यानंतर दुपारी या महामार्गावर माती टाकून रस्ता साफ करण्याचे काम सुरू होते. यासाठी महामार्ग पोलिसांनी मोठी मेहनत घेतली.
#khambatkighat
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 13th Jul 2024 12:43 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 13th Jul 2024 12:43 pm











