सगुनामाता मलठण येथे बंद घरात झालेल्या चोरीत सुमारे 2 लाख 25 हजाराचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐन दिवाळीच्या सणांमध्ये शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनेत वाढ झाली असून सगुनामाता मलठण येथे बंद घरात झालेल्या चोरीत सुमारे 2 लाख 25 हजाराचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र नारायण डोईफोडे (रा. सगुणामाता नगर, पाण्याचे टाकी समोर मलठण फलटण ता. फलटण) यांची दिनांक 26 रोजी तब्बेत बरी नसलेने घराला कुलुप लावुन बारामती येथे गेले होते. दि. 28 रोजी फिर्यादी बारामती येथे असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चुलत भाऊ यांचा फोन आला की, तु रहात असले घर उघडे दिसत असुन घराचे कुलुप कडी कोयंड्यासह तोडलेले दिसत आहे असे सांगितल्यावर फिर्यादी हे बारामतीहून फलटण येथे आले व घराचा दरवाजा उघडुन आत मध्ये जावुन पाहिले असता घरातील इतर साहित्य व्यवस्थित होते. 

बेडरुम मध्ये जावुन बेडरुम मध्ये असलेले लोखंडी जुने गोदरेजचे कपाट पाहिले असता ते उघडे दिसले म्हणुन कपाटाचे आतील लॉकर पाहिले असता लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम दिसली नाही. यावरुन फिर्यादी यांच्या लक्षात आले की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून नेहली आहे. या चोरीत 2 लाख 25 हजार अंदाजे 5 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, अंदाजे 2.5 तोळे वजनाचे सोन्याच्या चैनीतील गंठण व 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दिनांक 26 रोजी  सायं. 5.30  ते दिनांक दि. 28 रोजीचे सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान रहात असले भाड्याचे घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाचेतरी सहाय्याने घराचे दरवाजाची कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन घराचे बेडरुममध्ये असले लोखंडी गोदरेजचे कपाटीतील लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करुन चोरुन नेहले आहेत. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मलठण परिसरात पोलीस चौकी मंजूर झाल्यानंतर ही पोलीस चौकी उभारण्याबाबत कार्यवाही होत नसल्याने मलठण भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मलठण परिसरात पोलीस चौकी तत्काळ चालू करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला