छत्रपती शिवाजी कॉलेजला ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार

सातारा :  भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार २५ जानेवारी २०२३ ला १४ वा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रम अंतर्गत राज्यामध्ये या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे राज्यातील विविध ६ जिल्हा निवडणूक अधिकारी , ६ उप जिल्हा निवडणूक अधिकारी ,६ उत्कृष्ट मतदान नोंदणी अधिकारी ,समाज माध्यमात उत्कृष्ट प्रचार प्रसिद्धी करणारी ४ विधानसभा मतदार संघ कार्यालये, निवडणूक साक्षरता करणारी राज्यातील उत्कृष्ट ६ महाविद्यालये ,निवडणूक साक्षरता करणारे उत्कृष्ट नोडल अधिकारी, निवडणूक साक्षरता काम करणारे उत्कृष्ट विद्यार्थी सदिच्छा दूत,२ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्था ,१ लोकशाही उत्कृष्ट लोकशाही मित्र सामाजिक पुरस्कार, १ भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी काम करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी व १ निवडणूक विषयक उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार यांना  जयहिंद कॉलेज चर्चगेट मुंबई येथे  सत्कार समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  यात राज्यातील निवडणूक साक्षरतेसाठी काम करणाऱ्या  राज्यातील निवडलेल्या ६ उत्कृष्ट महाविद्यालयात ‘येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेले ‘छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा ‘या कॉलेजने आपला ठसा उमटवला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे ,व निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करून निवडणूक साक्षरता करणारे नोडल अधिकारी प्रा.डॉ.नीळकंठ लोखंडे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे हस्ते सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,ग्रंथ इत्यादी देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार  महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,डॉ.नीलकंठ लोखंडे ,प्रा.डॉ.शिवाजी पाटील यांनी स्वीकारला. निवडणूक साक्षरतेचे काम चांगले करून कॉलेजने उत्कृष्ट पुरस्कार मिळविल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संस्थेचे सचिव विकास देशमुख ,संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील ,उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.ज्ञानदेव मस्के,प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव मा.बी.एन .पवार व संस्थेचे विविध विभागातील प्राचार्य ,संस्था कार्यकर्ते  यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजचा प्राध्यापक  व प्रशासकीय स्टाफ यांनी  पुरस्कार मिळविल्याबद्दल प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,नोडल ऑफिसर प्रा.नीलकंठ लोखंडे व निवडणूक साक्षरता कामात सहयोग देणारे सर्व  प्राध्यापक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त