श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ येथे आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न..

सातारा (प्रतिनिधी)  : शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ सातारा संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्यु. कॉलेज करंजेपेठ सातारा येथे २१जून आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न झाला.. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर वसावे यांच्या हस्ते "सातारा योगधाम संस्थेच्या योग मार्गदर्शिका अलका कदम, सुप्रिया कथले, सुनिता बोराटे, सुधा कदम यांचा संस्थेचा सुवर्ण महोत्सवी "सुवर्णंमुद्रा" विशेषांक देऊन गौरव करण्यात आला ..


 सुप्रिया कथले यांनी योगाचे महत्व विषद करुन त्यांच्या सहका-यांच्या सहकार्याने प्रोटोकॉल प्रमाणे उत्तेजित व्यायाम प्रकार,योग व प्राणायम यांचे प्रात्यक्षिके सादर केली..विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनीही आनंदाने सहभाग घेऊन सर्व प्रकारच्या प्रात्यक्षिकांचे अनुकरण करुन योगदिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला ..


    *सदर योगदिनाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यक्षम सचिव तुषार पाटील आणि सर्व संचालक मंडळाचे विशेष मार्गदर्शन लाभले.. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सहभाग नोंदविल्या बद्धल योग मार्गदर्शिका अलका कदम यांनी त्यांचे विशेष कौतुक केले व जीवनाच्या सुदृढतेसाठी योग आणि प्राणायाम नियमित करा असा संदेश त्यांनी दिला..


   विद्यालयाचे क्रीडाशिक्षक यशवंत गायकवाड यांनी उपस्थित मार्गदर्शक आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला