साताऱ्यातील लोकसभेवरून जयकुमार गोरेंनी ठोकला शड्डू , कोणत्याही परिस्थितीत जागा सोडणार नाही ...जयकुमार गोरे आक्रमक
Satara News Team
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पाच राज्यांच्या विधानसभांच्या निकालानंतर लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील विविध पक्षांकडून लोकसभा मतदारसंघांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी कर्जत येथील अधिवेशनात सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केल्यानंतर आता साताऱ्यातील लोकसभा मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून चांगलच रणकंदन सुरू झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्यावतीनं पुरुषोत्तम जाधव यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. आता भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आक्रमक होत सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा आहे आणि आम्हीच या ठिकाणी लढणार असा दावा केल्यामुळं महायुतीमध्ये मतदारसंघावरून नवा पेच निर्माण झाला आहे.
भाजपानं गेल्या साडे तीन वर्षात या मतदासंघात मोठ्या ताकदीनं काम केल आहे. तसंच भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. यामुळं कोणी काहीही भूमिका मांडत असेल तरी हा मतदारसंघ कोणत्याही किमतीवर भाजपाकडंच राहिला पाहिजे, अशी भूमिका पक्ष श्रेष्ठींकडे मांडली आहे. आम्ही हा मतदारसंघ कोणत्याच परिस्थितीत सोडणार नसल्याचं सांगून जयकुमार गोरे यांनी थेट अजित पवारांना थेट आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. २००९ ला पुरुषोत्तम जाधव हे उमेदवार होते. त्यानंतर २०१४ हा मतदारसंघ आरपीआयला सोडण्यात आला. २०१९ च्या लोकसभेला हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला, निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेनेत आलेल्या नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.मात्र, नरेंद्र पाटील २०१९ ला पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेपासून अंतर राखलं आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर उदयनराजे भोसले निवडणूक जिंकले होते. मात्र, सहा महिन्यात राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांनी पोटनिवडणूक लढवली पण त्यांना अपयश आलं आणि श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. आता हा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे जाणार हे निश्चित आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 10th Dec 2023 04:06 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 10th Dec 2023 04:06 pm












