सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आ. शिवेंद्रसिंहराजे; गुरुवार बाग येथे भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ

सातारा ;  सातारा शहरातील विविध रस्ते कायमचे खड्डेमुक्त व्हावेत यासाठी काँक्रिटीकरणाचा पर्याय निवडून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असून सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे सर्व सहकारी कटिबद्धआहोत, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

 

श्रीमंत छ. शाहू उद्यान (गुरुवार बाग) येथील दर्शनी भागाची प्रशस्त भिंत बांधण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून १४ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, दत्ताजी थोरात, माजी नगराध्यक्ष अशोक मोने, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, धनंजय जांभळे, सौ. सुवर्णा पाटील, सौ. आशा पंडित, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, प्राची शहाणे, सुनीश शहा, डॉ. सचिन साळुंखे, निशा जोशी, अश्विनी हुबळीकर, रीना भणगे, यशवंत घोरपडे, फडतरे दाजी, विद्या आगाशे, विद्या सोडमिसे, प्रवीण मोने, विजय लोहार, किशोर पंडित, ओम ग्रुपचे सर्व सदस्य यांच्यासह प्रभागातील विविध मान्यवर, भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

 

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पोवई नाक्यापासून सिव्हिल हॉस्पिटल ते जरंडेश्वर नाका, बॉम्बे रेस्टोरंट चौक, गोडोली नाका या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम यापूर्वीच मार्गी लावले आहे. पोवई नाका, कदम बाग ते वाढे फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. किल्ले अजिंक्यतारावर जणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केल्याने पर्यटक व नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. शहरातील काही महत्वाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठीही निधी मिळवला आहे. शहरातील सर्वच रस्ते चकाचक करण्यावर भर दिला असून सातत्याने विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली जात आहेत. नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करून शहराचा कायापालट घडवून आणू, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी दिला. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला