वक्तृत्व कला समाजाचे नेतृत्व करायला शिकवते -सूर्यकांत पानस्कर

ढेबेवाडी : येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढेबेवाडी येथे मराठी वांड्.मय मंडळाचे उद्घाटन ग्लोबल व्यासपीठाचे संस्थापक सूर्यकांत पानस्कर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले,"समाजात अनेक ज्ञानवंत व प्रज्ञावंत माणसे आहेत.मात्र त्यांच्यात वक्तृत्वाचा अभाव असल्याने त्यांचे ज्ञान त्यांच्या पुरतेच मर्यादित राहिले. वक्तृत्व हे माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारे तसेच त्याच्या आचार विचारात संस्कारात बदल करणारे असते.ज्याला शब्दाची किंमत समजली त्याला आनंदाने जगता येते.वक्तृत्व माणसाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारी गोष्ट आहे. प्रभावी शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधून प्रबोधन करणे ही कला आहे. उपरोधिक, कोपरखळ्या मारत, माणसाला न दुखवता विनोद बुद्धीने टीका करत कोणताही विषय सहजपणे मांडता आला पाहिजे. वक्तृत्वाच्या माध्यमातून आपला इतरांच्या वरती प्रभाव पाडता येतो.बोलणारा माणूस सर्वांना आवडतो. एखादा विषय घेऊन त्यावर अभ्यासपूर्वक व सुंदर आवाजात वक्तृत्व सादर केल्यावर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. वक्तृत्वाच्या माध्यमातून अनेकांनी उच्चविभूषित पदे भूषवली आहेत. आपणही वक्तृत्व कला अवगत करून समाजात प्रतिष्ठा मिळवून समाजाचे नेतृत्व करावे."
       यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम.एस. पाटील म्हणाले,"वक्तृत्व कला अवगत करून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.वक्तृत्व कला प्रभावीपणे राबवून त्याचे सर्वांना प्रशिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे.
      याप्रसंगी विद्यालयात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रा. अनिल घोरपडे प्रा.सौ. निंबाळकर मॅडम, प्रा.सौ.क्षीरसागर मॅडम, सुशीलकुमार कुंभार, निलेश परदेशी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनी हजर होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दादाराम साळुंखे यांनी केले.सूत्रसंचालन अनिल पानस्कर यांनी केले.आभार संतोष देसाई यांनी मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला