पुसेगांव पोलिस स्टेशनची बदनामी थांबवण्यात यावी : धीरज जाधव जिल्हा उपाध्यक्ष

पुसेगाव : पुसेगाव   पोलिस स्टेशनचे  पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे  हे एक कर्तव्य दक्ष अधिकारी असून  पुसेगाव पोलिस स्टेशनचे  नाव  महाराष्ट्रभरच  नव्हे तर देशभर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.  नुकताच  पुसेगाव  पोलिस स्टेशन चा  महाराष्ट्रात पहिला नंबर आला  आहे.  यासाठी  कर्तव्यदक्ष  राहुन  सातत्याने प्रयत्न करणाऱ्या अधिकारी व  स्टाफची स्थानिक  राजकीय  गटबाजीतुन बदनामी  होऊ नये याची   दोन्हीही  राजकीय गटानी काळजी  घेणे  गरजेचे  आहे.  पुसेगाव  पोलिस स्टेशनचे  अधिकारी  व कर्मचारी  यांच्या चांगल्या कामाबाबत  राज्याचे  गृहमंत्री यांच्याशी फोनवर चर्चा  करून शिफारस केल्याचे भारतीय  जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष  धीरज  जाधव यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
        पुसेगांव हे नेहमीच राजकिय  दृष्टीने शांतता प्रिय गाव म्हणून  ओळखले जाते. पुसेगाव पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारीचे  प्रमाणही अत्यल्प आहे. जे गुन्हे घडले ते गुन्हे तातडीने उघडकीस आणण्यात पुसेगाव पोलीस स्टेशन आघाडीवर आहे. पुसेगाव पोलीस स्टेशनचे गुन्हेगारी क्षेत्रातील गुन्हे उघडकीचे नावलौकिक निश्चितच प्रशंशादायी आहे. याखेरीज पुसेगाव पोलिस स्टेशनचा आवार  ही सुंदर व सुसज्ज असा आहे.या सर्व बाबिंचा विचार होऊन पुसेगाव पोलिस स्टेशन चा  महाराष्ट्रात पहिला नंबर आला  आहे. अशा  पोलिस स्टेशनची  व अधिकाऱ्याची बदनामी  होऊ नये याची  काळजी पुसेगांव मधील   दोन्हीही राजकीय गटानी घ्यावी तसेच दोन्ही गटांनी पुसेगावच्या सर्वांगीण विकासासाठी हेवे दावे न करता प्रयत्नशील राहिले पाहिजे  असे आवाहन  सातारा जिल्हा युवा मोर्चाचे  उपाध्यक्ष  धीरज  जाधव  यांनी प्रसिद्धिस पत्रकाद्वारे केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला