राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?

पुसेसावळी  : महाराष्ट्रात महायुती सरकार (भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट) सत्तेत असताना विकास निधी व कामांचे वाटप युतीच्या भागीदारीने होत असल्याचा दावा केला जातो. पण सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गट मात्र वेगळीच कहाणी सांगतो. इथे विकासाच्या नावाने मोठमोठे निधी आले, रस्ते, पाणीपुरवठा, शाळा-आरोग्य सुविधा आदी कामे झाली, पण श्रेय घेण्याची स्पर्धा फक्त भाजपकडूनच दिसते. युतीचे इतर घटक कुठे दिसत नाहीत, असा आरोप स्थानिक स्तरावर होतोय.

              पुसेसावळी गट ज्यात पुसेसावळी व म्हासुर्णे पंचायत समिती गणांचा समावेश होतो. विशेष म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारचे तिन्ही घटकपक्ष एकमेकां समोर उभे ठाकले आहेत. गेल्या काही वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतून इथे लाखो- करोडोंचा निधी आला. ग्रामसडक योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, शालेय इमारती, आरोग्य केंद्रे आदींसाठी निधी वितरित झाला. पण या कामांचे उद्घाटन, फलक लावणे, सोशल मीडियावर पोस्ट करणे, प्रचार सभा घेणे हे सगळे भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यां कडूनच होताना दिसते.

          पुसेसावळी जिल्हा परिषद गटात सौ. तेजस्विनी विक्रमशील कदम या भाजपच्या अधिकृत उमेदवार असून, त्यांच्या प्रचारात "विकास निधी आणला, कामे केली" असा दावा ठामपणे केला जातो. प्रचार दौर्‍यात, हळदी-कुंकू कार्यक्रमात, गावोगावी भेटी देताना "भाजपनेच विकास केला" असा संदेश दिला जातो. सोशल मीडियावरही भाजपचे कमळ चिन्ह लावून विकास कामांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होतायत.

मात्र युती सरकार असताना जिल्हा परिषद निधी, आमदार/खासदार निधी, पालकमंत्री निधी यांचा वापर होतो. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे गट) आहेत. तरीही पुसेसावळी गटात शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विकास निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दिसत नाही. उलट, शिवसेना शिंदे गटाकडून सौ. काजल सुभाष कदम (नांगरे पाटील) या उमेदवार असल्या तरी त्यांचा प्रचार "मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मा.पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या आशीर्वादाने" असा आहे, विकास निधीवर फारसा भर नाही. राष्ट्रवादी कडून ही कु.रिया सुभाष पिसाळ, उमेदवार आहेत, पण त्यांचा फोकस "घराणेशाहीला विरोध" आणि "जनशक्ती" वर असून "धनशक्ती vs जनशक्ती" चा नारा देतायत. पण विकास निधीचे श्रेय फक्त भाजपकडेच राहताना दिसते. 

                स्थानिक एका मतदाराने सांगितले, "सरकार युतीचे आहे, निधी सर्वांकडून येतो. पण फलकावर, कार्यक्रमात फक्त भाजपचे नेते दिसतात. युतीचे इतर पक्ष काय करतायत? फक्त निवडणुकीत चिन्ह मागायला येतात का?" हे चित्र पुसेसावळी गटात स्पष्ट दिसते. युती सरकारच्या नावाने निधी येतो, पण श्रेय फक्त एकाच पक्षाचे! सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हाच मुद्दा मोठा वादळ निर्माण करेल का? पुसेसावळी गटातील मतदारांकडे आता प्रश्न आहे.विकासाचे खरे श्रेय कोणाचे? युतीचे की फक्त भाजपचे?

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला