BREAKING वनमजुरांना सर्वांसमोर नाक घासायला लावले कास पठार कार्यकारी समितीच्या पदाधिकाऱ्याची हिटलरशाही,
कोमल वाघ / पवार
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
- बातमी शेयर करा
कास : कास पठारावर वनमजूर म्हणून मागील चार वर्षांपासून काम करत असलेल्या श्री भगवान आखाडे आणि श्री आत्माराम आखाडे यांना रोजगार पाहिजे असल्यास सर्वांसमोर नाक घासून माफी मागावी लागेल असे सांगण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना कोणतेही कारण न देता मागील वर्षी कामावरून तडकाफडकी काढण्यात आले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची उपासमार होऊ लागल्याने त्यांनी लोकशाही मार्गाने अंदोलन सुरू केले होते. यामध्ये वेळोवेळी आपल्याला सोमनाथ जाधव या पेट्री येथील माध्यमिक विद्यालयातील क्लार्क ने दिलेल्या अन्यायकारक वागणुकीविरुद्ध आवाज उठवला होता. ही क्लार्क व्यक्ती पेट्री येथील विद्यालयात फक्त सहीसाठी जाऊन दिवसभर कास पठारावर थांबुन दुसरा समितीच्या माध्यमातून भत्ता व पगार घेत आहे. याचे पुरावे उपलब्ध आहेत. आणि तेथे हम करे सो कायदा ठरवून सर्व कर्मचाऱ्यांना वेठबिगाराची वागणुक देत आहे या दडपशाही विरुद्ध या दोन कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला होता. आणि याचाच मनात राग धरून विद्यालयात सतत गैरहजर राहून फुल पगार घेणाऱ्या महाशयाने प्रामाणिक काम करणाऱ्या मजुरांना द्वेषभावनेने देषोधडीला लावण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. सगळे समिती सदस्य यांना कामावर रजू करून घेण्यासाठी तयार असताना या एकाच व्यक्तीने आपले प्रथम प्राधान्य विद्यालयातील काम सोडून जास्त काळ कास पठारावरील व्यवस्थापन करण्यातून आर्थिक,राजकीय लाभ मिळवत कर्मचाऱ्यांवर दडपशाही चालवली आहे.या दोन कामगारांना नाक घासून माफी मागितली तरच कामावर घेतो असे सांगण्यात आल्यानंतर सगळीकडुन कास पठार समितीला रोषाला सामोरे जावे लागत आहे.या सदस्याच्या हिटलरी वागण्याचा इतर वनविभाग व कास समिती सदस्यांना देखील त्रास होत असल्याचे सर्व सदस्य खाजगीत सांगत आहेत. या वनमजुरांनी अन्यायकारक वागणुकीविरुद्ध लोकशाही पद्धतीने अंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
#KAAS
#KAASPATAR
#VANMAJUR
स्थानिक बातम्या
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
संबंधित बातम्या
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
-
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
-
नावलीतील जमीन खचल्याच्या घटनेने धोक्याची घंटा; महाबळेश्वर तालुक्यातील ६ गावे भूस्खलनाच्या अत्यंत जोखमीत
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
-
जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड
- Wed 30th Aug 2023 09:55 pm
-
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Wed 30th Aug 2023 09:55 pm











