विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात स्काऊट-गाईड जीवनशैली अंगीकारून आपला विकास साधला पाहिजे - महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ

पाचगणी : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात स्काऊट-गाईड जीवनशैली अंगीकारून आपला विकास साधला पाहिजे असे आवाहन महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी केले.
 जिल्हा परिषद सातारा, भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने तळदेव येथील इलाबेन महेता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात आयोजित तालुकास्तरीय कब बुलबुल आणि स्काऊट गाईड एक दिवसीय शिबीर  प्रसंगी मरभळ बोलत होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख प्रकाश भिलारे, दिपक चिकणे, दिलीप जाधव, केंद्रसंचालक संजय संकपाळ तसेच मार्गदर्शक भालचंद्र सोनावणे संघटक कविता चौगुले, राठोड, सुरेश चव्हाण, उमेश मिसाळ आणि मुख्याध्यापक एस.आर.पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या शिबिरात ७७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सकाळच्या सत्रात सर्व शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर स्काऊटच्या परंपरेनुसार ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर प्रार्थना, ध्वजगीत गायनाने शिबीरास सुरूवात झाली.
कब आणि बुलबूल युनिट श्री तळेश्वर मंदिराच्या प्रांगणात क्रमबद्ध ६ -६ जणांच्या रांगेत उभे राहून टाळ्यांच्या विविध प्रकारांचा सराव घेण्यात आला. यानंतर कब बुलबूलचे नियम, वचन, वंदन, हस्तांदोलन, कबचे गीत, प्रार्थना, गोलातील मनोरंजक खेळ, तारा व मोगलीची गोष्ट, बडी सलामी व जंगी आरोळीचा सराव घेण्यात आला...


तर स्काऊट आणि गाईड युनिटला विद्यालयाच्या प्रांगणात
 स्काऊट व गाईडचे वचन, ध्येय, नियम, हस्तांदोलन, अभ्यासक्रम उजळणी, प्रार्थना, ध्वजगीत, विविध खेळ, गाणी, प्रथमोपचार, गाठीचे प्रकार आणि टाळ्यांचे प्रकार तसेच मागाच्या खुणा, जंगलभ्रमंती व त्यामधील आठवणी, बेडन पॉवेल यांचे  जीवनचरित्रातील प्रसंग, बलोपासना, संदेशन पद्धती इ.बाबत सखोल मार्गदर्शन केले.


समारोप सत्रात सर्व सहभागी शाळांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सरतेशेवटी शिबीराचा समारोप ध्वजावतरण व राष्ट्रगीत गायनाने करण्यात आला.


सदर शिबीराच्या यशस्वितेसाठी कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेवच्या सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील सर्व केंद्रांचे क्रीडासमन्वयकांसमवेत श्रीनिवास ढाणे, चंद्रकांत जंगम, पांडुरंग संकपाळ व सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक यांचेही याकामी अपेक्षित सहकार्य लाभलेमुळे हे शिबीर यशस्वीपणे पार पडले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडासमन्वयक श्रीगणेश शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी निकम यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त