स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच कोंबींग ऑपरेशनची कारवाई केली. यामध्ये पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून २ देशी बनावटीची पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, २ मोटार सायकल असा २ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेस सातारा शहरात कोंबींग ऑपरेशन तसेच राष्ट्रीय महामार्गावर गुन्हे प्रतिबंधक पेट्रालिंग करुन पोलीस अभिलेखावरील आरोपी व अन्य संशईत इसमांना चेक करुन प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.


पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व परितोष दातीर यांचे पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर पेट्रोलिंग करीत असताना म्हसवे गावचे हद्दीत डि. मार्ट ते वाढे फाटा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ चे सर्व्हिसरोड वरील म्हसवे गावाकडे जाणारे पुलाचेखाली पोलीस अभिलेखावरील आरोपी प्रथमेश उर्फ टॉम बाळासाहेब जगताप, (रा.वर्ये, ता.जि.सातारा) व २ अनोळखी इसम उभे असल्याचे दिसले. पोलीसांचे वाहन दिसताच त्यापैकी २ इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. एका इसमास पथकातील पोलीसांनी शिताफिने पकडून त्याची अंगझडती घेतली.


त्यावेळी त्याचे कब्जात १ लाख ४० हजार रुपये किमतीची २ देशी बनावटीची पिस्टल, सहाशे रुपये किमतीचे ३ जिवंत काडतुसे व 85 हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल मिळून आल्याने त्यांचे विरुध्द सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं.३६३/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम (सुधारीत २०१९) चे कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त