सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

सातारा :  सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाची चिमुकली कु.निविता विनीत ढेंबरे हिच्या हस्ते भैरवनाथ विद्यालय व ज्यु.कॉलेज किडगांवच्या मैदानावर सपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण संघटनेचे  व सातारा जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर वाय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली किडगावच्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच स्पर्धाआयोजक महेंद्रजी गाढवे,सरपंच सविता रत्नदीप इंगवले उपसरपंच संतोष इंगवले सोसायटीचे चेअरमन व माजी उपसरपंच युवा नेते इंद्रजीतदादा ढेंबरे माजी उपसरपंच कॅप्टन विठ्ठल इंगवले, अशोक ढेंबरे राष्ट्रीय प्रशिक्षक सायराबानू शेख, राष्ट्रीय कबड्डीपटू व महाराष्ट्र संघाचे कर्णधार परशुभाऊ इंगवले, विद्यालयाचे प्राचार्य पावरा सर ,क्रीडा संघटनेचे पदाधिकारी मारुती माने, विजयराव यादव,राजेंद्र माने, पांडुरंग कणसे, लहू उर्फ यशवंत गायकवाड ,आणि तालुक्यातून विविध संघाबरोबर आलेले क्रीडा शिक्षक,मार्गदर्शक तर स्पर्धा सयोजनांसाठी शिवाजी उदय मंडळाचे मान्यवर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पंचही उपस्थित होते...
    स्पर्धा उद्घाटनाच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा करून करण्यात आली...


    तेव्हा स्पर्धेची उद्घाटक म्हणून चिमुकल्या निविताने केलेले भाषण उपस्थितांचे भुवया उंचावणारे ठरले तिने आपल्या भाषणात विद्यार्थी विद्यार्थिनींना उद्देशून मोबाईलच्या आहारी न जाता नियमित खेळाची,आहाराची तसेच व्यायामाची आवड जोपासावी असे संबोधित केले... तेव्हा आर. वाय.जाधव सरांचेही खेळाडूंना मार्गदर्शन पर भाषण झाले. आणि तदनंतर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रत्यक्ष मैदानावर नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले... आणि मोठ्या आनंदमय वातावरणात दिवसभर उत्तम प्रकारे स्पर्धेचे नियोजन आयोजक शाळेने तसेच शाळेला दिलेली ग्रामस्थांनी साथ ही विशेष कौतुकास्पद होती.....


    स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय खेळाडू रत्नदीप इंगवले,अजित इंगवले, संदीप भाऊ ढेंबरे..सुजित इंगवले,हणमंत टिळेकर प्रितेश इंगवले प्रदीप सकुंडे,धनाजी शिंदे आदम भाई पठाण आणि ग्रामस्थ व विविध शाळेतून आलेले  खेळाडू तसेच क्रीडाशिक्षक व मार्गदर्शक यांचे विशेष सहकार्य लाभले....

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला